Aparna Kanekar Died: 'साथ निभाया साथिया' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Aparna Kanekar Died: अभिनेत्री लवली सासननं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन अपर्णा काणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Aparna Kanekar Died: 'साथ निभाना साथिया' (Sath Nibhana Sathiya) या मालिकेमधील अभिनेत्री अपर्णा काणेकर (Aparna Kanekar) यांचे निधन झाले आहे. अपर्णा काणेकर यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री लवली सासननं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन अपर्णा काणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि साथ निभया साथियाची संपूर्ण टीम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साथ निभया साथिया या मालिकेत अपर्णा काणेकर यांनी जानकी बा ही भूमिका साकारली होती.
अभिनेत्री लवली सासननं अपर्णा काणेकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज माझे मन खूप दु:खी झाले आहे कारण माझ्या अत्यंत प्रिय व्याक्तीचे निधन झाले आहे. बा तू सर्वात सुंदर आणि स्ट्राँग व्यक्तींपैकी एक होतीस. सेटवर आम्ही जे अविस्मरणीय क्षण घालवू शकलो याबद्दल मी स्वत:ला खरोखरच नशिबवान समजत आहे. रेस्ट इन पिस माय डिअर बा. मी तुला खूप मिस करेन."
लवलीनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी अपर्णा काणेकर यांना श्रद्धांजली वाहिली. उप्पेखा जैन,तान्या शर्मा, काजल पिसाळ यांनी देखील लवलीनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अपर्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लवलीनं साथ निभया साथिया या मालिकेत परिधी ही भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
अपर्णा यांनी 'साथ निभाया साथिया' मध्ये बा ही भूमिका साकारली होती. त्यांनी या शोमध्ये ज्योत्सना कार्रेकर यांना रिप्लेस केले होते. अपर्णा यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अपर्णा आणि 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील कलाकारांमध्ये चांगले Bonding होते.
साथ निभाना साथिया ही मालिका 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत मोहम्मद नाज़िम, देवोलीना भट्टाचार्य ,रुचा हसब्निस,विशाल सिंह आणि रूपल पटेल या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली. अनेक वर्षे या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.