एक्स्प्लोर
सलमानच्या जामीनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे.
जयपूर: काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावरचं संकट कायम आहे. कारण दोन रात्री जेलमध्ये काढलेल्या सलमानच्या जामीनावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. मात्र या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे.
न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह 87 न्यायाधीशांची बदली झाली आहे. ही नियमित बदली असल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यामुळे सलमानच्या जामीनावरील सुनावणीचं संकट कायम आहे.
..तर सलमानला जामीन
केवळ निर्णय बाकी असल्यामुळे एखादे न्यायाधीश बदलीनंतरही जामीन अर्जावर निर्णय देऊ शकतात. मात्र त्यांना ते बंधनकारक नसतं. काही न्यायाधीश सुनावणी घेतात, तर बहुसंख्य न्यायाधीश बदलीनंतर निर्णय देत नाहीत.
त्यामुळे न्यायाधीश रवींद्र जोशी हे आज सलमानच्या जामीनाबाबत कोणता निर्णय घेतात, हे त्यांच्यावरच अवलंबून आहे.
सलमानच्या अडचणी
एकीकडे न्यायाधीशांच्या बदलीमुळे तांत्रिक पेच निर्माण झाला असताना, दुसरीकडे सलमानच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. कोर्टाने काल काळवीट शिकारप्रकरणातील कागपत्र मागवले होते. मात्र आता ज्या न्यायाधीशांनी कागदपत्र मागवली, त्याच न्यायाधीशांची बदली झाली आहे.
जर सलमानच्या जामीनावर आज सुनावणी झाली नाही, तर सलमानला आणखी दोन रात्री तरी जेलमध्येच काढाव्या लागू शकतात.
सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद
जोधपूर सेशन कोर्टानं काल सलमानच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय न देता, त्याची सुनावणी उद्यावर म्हणजे शनिवारवर ढकलली. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी सलमान खानच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला.
शिकारीसाठी सलमाननं जी कार वापरली, ती नेमकी कुठून जप्त केली, याबाबत अनेक शंका असल्याचं दावा सलमानच्या वकिलांनी केला. या आधारावर सलमानच्या जामीनाची मागणी केली. मात्र कोर्टानं याबाबतची सुनावणी शनिवारी होणार असल्याचं जाहीर केल्यानं, सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली.
सलमानला 5 वर्षांची शिक्षा
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी 5 एप्रिलला जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.
शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
संबंधित बातम्या
काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
सलमानसाठी एक न्याय, अन् इतर कैद्यांना वेगळा न्याय!
सलमान न जेवता रात्रभर जमिनीवर झोपला
सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement