Bipasha Basu Daughter: बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती दोन छिद्रं,लेकीबाबत बोलताना अभिनेत्री झाली भावूक
Bipasha Basu Daughter: बिपाशाने नेहा धुपियासोबत केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये तिच्या मुलीबाबत सांगितले.
![Bipasha Basu Daughter: बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती दोन छिद्रं,लेकीबाबत बोलताना अभिनेत्री झाली भावूक bipasha basu cry she reveals her daughter devi was born with two holes in her heart had surgery 3 months after birth Bipasha Basu Daughter: बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती दोन छिद्रं,लेकीबाबत बोलताना अभिनेत्री झाली भावूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/06/1926c435440151d5eb51da249af064931691313364573259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bipasha Basu Daughter: वयाच्या 43 व्या अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आई झाली. बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलगी झाली. एक पोस्ट शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'देवी' असं ठेवलं. बिपाशाने नेहा धुपियासोबत केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये तिच्या मुलीबाबत चर्चा केली. बिपाशाने सांगितले की, देवीच्या हृदयाला दोन छिद्रे होती.
बिपाशानं सांगितलं की, देवीला वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टचा (Ventricular septal defect) त्रास होता. नवजात देवीच्या हृदयाला दोन छिद्रे होती. त्यानंतर ती सुमारे 3 महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाईव्हमध्ये देवीबाबत बोलताना बिपाशा भावूक झाली.
बिपाशा बसूने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितलं,"आमचा प्रवास कोणत्याही सामान्य पालकांपेक्षा खूप वेगळा होता. हे कोणत्याही आईच्या बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलीच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी मला कळालं की, आमच्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्र आहेत. मला वाटले होते की मी हे शेअर करणार नाही, पण मी हे शेअर करत आहे."
View this post on Instagram
पुढे बिपाशानं सांगितलं, "जेव्हा देवी तीन महिन्यांची होती तेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियाला सहा तास लागले.ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली."
View this post on Instagram
बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हरनं 2016 मध्ये लग्न केलं. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं कुबूल है, दिल मिल गए, दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे. बिपाशा ही करण आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बिपाशानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)