Bigg Boss 17 : समर्थने ऐश्वर्याला चुकीच्या जागी स्पर्श केला? खानजादीच्या वक्तव्यावर रिंकू धवन म्हणाली,"मी याचा जीव घेईन"
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात ट्वीस्ट येत आहेत. आता खानजादीच्या (Khanzaadi) एका वक्तव्यामुळे रिंकू धवनला (Rinku Dhawan) राग अनावर झाला आहे.
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. प्रत्येक दिवशी 'बिग बॉस'च्या घरात नवीन काहीतरी घडत असतं. 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी स्पर्धक कोणत्याही थराला जात आहेत. नुकताच पार पडलेला 'वीकेंड चा वार' चांगलाच चर्चेत आला. या कार्यक्रमात सलमानसह (Salman Khan) करण जोहरदेखील (Karan Johar) स्पर्धकांची शाळा घेताना दिसून आला. सलमानने शाळा घेतल्यानंतर स्पर्धकांना अश्रू अनावर झाले. तर दुसरीकडे रिंकू धवनचं (Rinku Dhawan) एक वेगळचं रुप पाहायला मिळालं.
'बिग बॉस'च्या घरात इम्यूनिटी टास्टदरम्यान चांगलाच हंगामा पाहायला मिळाला. महिला स्पर्धकांपासून लांब राहण्याच्या खानजादीच्या सल्ल्यानंतर घरातील सर्व स्पर्धक त्याच्यावर भडकले. त्यानंतर खानजादीने यामागचं कारण सांगितलं आणि रिंकू धवनचा राग अनावर झाला. खानजादी रिंकूला म्हणाला,"ऐश्वर्या सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी टास्कमध्ये म्हणाली आहे की, चिंटूने (समर्थ) चुकीच्या जागी स्पर्श केला".
रिंकू धवन खानजादीवर भडकली
खानजादीच्या बोलण्यानंतर रिंकू धवनचा राग अनावर झाला आहे. रिंकू धवन खानजादीवर भडकलेली पाहायला मिळाली. खानजादीला ती म्हणाली,"तुला मी बर्बाद करेल. तू जीव द्यायला हवा. एक चांगली बाई तू नव्हे. खानजादीला लाज वाटायला हवी". रिंकूला एवढं भडकलेलं पाहून विकी जैनने (Vicky Jain) तिला शांत केलं.
'बिग बॉस 17'मध्ये K-Pop सिंगरची एन्ट्री!
'बिग बॉस 17' या कार्यक्रमात लोकप्रिय K-Pop सिंगरची एन्ट्री झाली आहे. कोरियन गायक औरा आता 'बिग बॉस 17' गाजवण्यास सज्ज आहे. आजच्या भागात औराची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताना पाहायला मिळेल. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या के-पॉप गायकाची एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस'मध्ये यंदा 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 'दिल, दिमाग और दम' अशी यंदाची थीम आहे. या थीमवर आधारित मोहल्ला 1, मोहल्ला 2 आणि मोहल्ला 3 या भागात स्पर्धक राहत आहेत. 'बिग बॉस 17'च्या आगामी भागात काय घडणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या