एक्स्प्लोर

रिलीजच्या चौथ्या दिवशी 'भूल भुलैया 3'चा 'सिंघम अगेन'ला धोबीपछाड; एकटा कार्तिक बड्या स्टारकास्टवर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धुरळा

Bhool Bhulaiyaa 3 box Office Collection Day 4:पहिला वीकेंड संपता संपता, भूल भुलैया 3 नं दाखवून दिलं की, हा चित्रपट सिंघम अगेनपेक्षा कमी नाही.

Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 4: दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले. एक मल्टिस्टारर सिंघम अगेन आणि दुसरा कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3.  विकेंडच्या दिवशी सिंघम अगेननं मजल माकरल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 ला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत होती. पण, विकेंड सरता सरता रूह बाबाच्या रुपात झळकलेल्या कार्तिक आर्यननं प्रेक्षकांना आपल्या अभिनयानं भूरळ घातली आहे. कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' या हॉरर कॉमेडीनं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.

पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई करून कार्तिकचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'लंबी रेस का घोडा' ठरणार असल्याचं दाखवून दिलं. अशातच या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊया, या चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली आहे, त्याबाबत सविस्तर... 

भूल भुलैया 3 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 35.5 कोटी, दुसऱ्या दिवसाची कमाई 37 कोटी आणि तिसऱ्या दिवसाची कमाई 33.5 कोटी आहे. म्हणजेच, चित्रपटानं मोठ्या थाटात 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सैक्निल्कवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, चित्रपटानं चौथ्या दिवशी रात्री 9:55 वाजेपर्यंत 14.47 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई 120.47 कोटी रुपये आहे. हा आकडा फायनल नसला तरीसुद्धा या आकड्याच्या जवळपास चित्रपटानं कमाई केली आहे. यामध्ये काही फेरबदल होत राहतात. 

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

'भूल भुलैया 3' कार्तिक आर्यनच्या करिअरची सर्वात मोठी फिल्म 

'भूल भुलैया 3' कार्तिक आर्यनच्या करिअरची सर्वात मोठी फिल्म बनली आहे. फिल्मनं पहिल्याच दिवशी  35 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तसेच, त्याच्या करिअरची सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली, 2022 मध्ये आलेली 'भूल भुलैया 2', जिनं 14 कोटींच्या आसपास कमाई केली होती.  याव्यतिरिक्त हा चित्रपट विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या करिअरची सर्वात मोठी ओपनिंग देणारी फिल्म ठरली आहे. 

सिंघम अगेन vs भूल भुलैया 3, कार्तिकनं मारली बाजी

अर्थात, सिंघम अगेनने कार्तिकच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली असेल, पण ट्रेंडनुसार कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची चाल सिंघम अगेनपेक्षा चांगली दिसतेय. याची अनेक कारणे आहेत.

  • पहिली गोष्ट म्हणजे, चित्रपटाला सुरुवातीला सिंघम अगेनपेक्षा 25 टक्के कमी स्क्रीन शेअर मिळाला, तरीही चित्रपटानं तीन दिवसांत 100 कोटी रुपये कमावले.
  • दुसरं म्हणजे, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये असलेली चर्चा लक्षात घेता, चित्रपटाचे दोन अतिरिक्त शो देखील प्रेक्षकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेत, जे रात्री उशिरा 1 आणि पहाटे 3 वाजता सुरू होणार आहेत.
  • सिंघम अगेननं तिसऱ्या दिवशी 35 कोटी रुपये कमावले, तर भूल भुलैया 3 नं 33.5 कोटी रुपयांची कमाई केली. हे स्पष्ट आहे की, कमी स्क्रीन शेअरसह, चित्रपटानं जवळजवळ सिंघम प्रमाणेच कमाई केली.
  • आता चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्येही, भूल भुलैया 3 सिंघम अगेनपेक्षा जास्त कमाई करताना दिसत आहे. ज्यावरून हे स्पष्ट होतं की, भूल भुलैया 3 सिंघम अगेनपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे नाही.

भूल भुलैया 3 बाबत थोडसं... 

भूल भुलैया 3 हा चित्रपट भूल भुलैया सीरिजचा तिसरा भाग आहे आणि या मालिकेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरणार आहे. कार्तिक आर्यनशिवाय या चित्रपटात तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाला लोक आणि समीक्षक दोघांचंही खूप प्रेम मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'सिंघम'च्या जलव्यानं हादरलं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिस, चित्रपटाची 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Embed widget