एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 3 Collection: बॉक्स ऑफिसवर कार्तिकची जादू, 150 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार रुह बाबा; पाचव्या दिवशी कितीचा जमवला गल्ला?

Bhool Bhulaiyaa 3 Collection: कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 ची बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेनसोबत टक्कर झाली. यामध्ये सिंघम अगेनच्या तगड्या स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन भारी पडला.

Bhool Bhulaiyaa 3 BO Collection Day 5: बॉक्स ऑफिसवर (Box Office) कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) जादू पाहायला मिळत आहे. कार्तिकनं साकारलेला रुह बाबा लोकांना भलताच आवडला आहे. दिवाळीपासूनच रुह बाबानं प्रेक्षकांना जणू आपली भूरळ घातली आहे. भूल भुलैया 3 बॉक्स ऑफिसवर गाजत असून दररोज कमाईचे नवे विक्रम रचत आहे. 

कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 ची बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेनसोबत टक्कर झाली. यामध्ये सिंघम अगेनच्या तगड्या स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन भारी पडला. वीक डेजमध्येही कार्तिकचा भूल भुलैया 3 दोन आकड्यांत कमाई करत आहे.  हा चित्रपट दररोज कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या सिंघम अगेनला टक्कर देत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाचव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. त्यानंतर आता हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबपासून दूर नाही, असं म्हणता येईल. दरम्यान, भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून चांगलं कलेक्शन केलं आहे. 

पाचव्या दिवशीही बक्कळ कमाई... 

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भूल भुलैया 3 नं पाचव्या दिवशी सुमारे 13 कोटी कमावले आहेत. हे अजूनही सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आहे. कलेक्शनचा खरा डेटा समोर येईल, तेव्हा तो त्यापेक्षा कितीतरी अधिक असेल. पाचव्या दिवसाच्या कलेक्शननंतर चित्रपटाची एकूण कमाई 137 कोटी झाली आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 35.5 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 33.5 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून दूर नाही.

भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तृप्तीनं चित्रपटाला ग्लॅमरचा टच दिला आहे. कार्तिक आणि विद्याच्या अभिनयाचं कौतुक करताना लोक थकत नाहीत.

'भूल भुलैया 3' कार्तिक आर्यनच्या करिअरची सर्वात मोठी फिल्म 

'भूल भुलैया 3' कार्तिक आर्यनच्या करिअरची सर्वात मोठी फिल्म बनली आहे. फिल्मनं पहिल्याच दिवशी  35 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तसेच, त्याच्या करिअरची सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली, 2022 मध्ये आलेली 'भूल भुलैया 2', जिनं 14 कोटींच्या आसपास कमाई केली होती.  याव्यतिरिक्त हा चित्रपट विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या करिअरची सर्वात मोठी ओपनिंग देणारी फिल्म ठरली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again Box Office Collection: 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच; पाचव्या दिवशी 150 कोटींचा टप्पा पार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget