Bhaukaal 2 : मोहीत रैनाने भारतभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिली मानवंदना
Bhaukaal 2 : मोहीत रैनाने भारतभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमांना अभिवादन केले आहे.
Bhaukaal 2 : एमएक्स प्लेअरवर अलीकडेच प्रसारित झालेली आयपीएस अधिकारी नवनीत सेकेरा यांच्या आयुष्यावर भाष्य करणारी मालिका म्हणजे 'भौकाल 2'. मालिकेची सुरूवात यशस्वी झाली आहे. त्यामुळे एमएक्स प्लेअरने 1961 मध्ये दिल्लीमध्ये स्थापन झालेल्या देशाच्या काही सर्वात जुन्या पोलीस स्टेशन्सपैकी एक असलेल्या तसेच 2021 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरविल्या गेलेल्या ऐतिहासिक सदर बाझार पोलीस स्टेशनबरोबर सहयोग साधला.
नवनीत सेकेरा यांची भूमिका साकारणाऱ्या मोहीत रैनाने नि:स्वार्थ वृत्तीने देशसेवा करणाऱ्या, विशेषत: जागतिक पॅनडेमिकच्या काळामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दीमधल्या पोलिसांच्या अथक परिश्रमांना अभिवादन केले आहे. संपूर्ण देशाच्या वतीने असा आदर आणि सन्मान मिळताना पाहण्याची संधी देणारा हा दिवस आपल्या देशाच्या या शूर अधिकाऱ्यांसाठी खरोखरीच अविस्मरणीय असा होता.
या उपक्रमाविषयी मोहीत रैना म्हणाला,"वेबवरील काही अत्यंत सफाईदार आणि सर्वात यशस्वी क्राइम मालिकेचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. प्रेक्षकांकडून आमच्यावर जी प्रेमाची बरसात होत आहे त्याने मी खरोखरीच भारावून गेलो आहे. या भूमिकेसाठी मला आयपीएस अधिकारी नवनीत सेकेरा यांच्या अत्यंत निकट संपर्कात राहून काम करण्याची संधी मिळाली, आपल्याला आणि आपल्या देशाला सुरक्षित राखण्यासाठी किती कष्ट घेतले जात असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. अशाप्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या या अधिकाऱ्यांचे त्यांच्या नि:स्वार्थी सेवेसाठी आभार मानायचे होते. ते आपल्या देशाचे खरेखुरे सुपरहीरोज आहेत."
संबंधित बातम्या
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा ठरलेल्या वेळीच प्रदर्शित होणार
प्रेक्षकांनाच नाही तर, कलाकारांनाही ‘लोच्या झाला रे’ची उत्सुकता, चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित!
Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha