BanLipstick : सोशल मीडियावर 'बॅन लिपस्टिक' हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये, आघाडीच्या अभिनेत्रींनी केला व्हिडीओ शेअर
BanLipstick : 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

BanLipstick : सोशल मीडियावर सध्या 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच ट्रेडिंगमध्ये आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरत मराठीमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. मराठी रंगभूमी, छोटा पडदा, सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्रींचा यात समावेश आहे. त्यामुळे हा हॅशटॅग कशासाठी आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
तेजस्विनी पंडीतने 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक!' अशी कॅप्शन देत #BanLipstick हा हॅशटॅग वापरला आहे. दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील #BanLipstick हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन लिहिली आहे,"मला लिपस्टिकचा रंग नको...मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!". सोनाली खरेनेदेखील लिपस्टिक पुसतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले आहे,"माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक".
View this post on Instagram
तेजस्विनी आणि प्राजक्ता व्हिडीओमध्ये लिपस्टिक लावतात. आणि नंतर पुसून टाकतात. मराठमोळ्या अभिनेत्रींना असा व्हिडीओ शेअर केल्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटते आहे. तर कलाकारदेखील गोंधळून गेले आहेत. तेजस्वीनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंट केली आहे, "क्या हुआ भाई".
View this post on Instagram
अभिनेत्रींनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ते आगामी सिनेमाचे प्रमोशन असेल, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत. दुसरीकडे 'लिपस्टिक लावलीच आहे तर पुसताय का' असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. आता हा प्रमोशन फंडा आहे की आणखी काही वेगळं प्रकरण आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















