एक्स्प्लोर
रितेशचा लय भारी अंदाज, 'बँजो'चा ट्रेलर रिलीज
मुंबईः बॉलिवूड स्टार रितेश देशमुखच्या 'बँजो' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालं आहे. रितेशचा या ट्रेलरमध्ये जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. मराठीतील 'लय भारी' या सुपरहीट सिनेमानंतर रितेशचा असा अंदाज 'बँजो'मध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
रितेशने ट्रेलर रिलीज झालं असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. 'देखो जलवा' अशा कॅप्शनसह रितेशने हे ट्रेलर शेअर केलं आहे. 'बँजो' सिनेमा चार संगीत कलाकारांच्या संघर्षावर आधारित आहे.
मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रितेशसह बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 23 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान 'लय भारी' नंतर रितेशचा असा अफलातून अंदाज प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
फोटोवर क्लिक करुन पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement