एक्स्प्लोर
'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला!
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'ठाकरे' या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला.
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बेतलेल्या 'ठाकरे' या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.
या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. नवाजुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खान यांच्या नावाचीही चर्चा होती. 'ठाकरे' असं या बायोपिकचं नाव आहे.
राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.
संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा," असं मला वाटतं.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील सिनेमा #ठाकरे नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेबांची भूमिका, खरे बाळासाहेब कळणार. पाहा पहिला टीझर.#BalaSahebThackeray#Thackeray@uddhavthackeray@Nawazuddin_S@SrBachchan@ShivSena@MarathiBrain@Marhathipic.twitter.com/48pGCWSBcD
— Shishupal Kadam (@RealShishupal) December 21, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement