Bajarang Puniya : 'शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केला तर...', विमानतळावर झालेल्या प्रकरणानंतर बजरंग पुनियाची कंगणा रणौतवर खरमरीत टीका
Bajarang Puniya on Kangana Ranaut : कंगना रणौतवर झालेल्या हल्ल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरु आहे.
Bajarag Puniya on Kangana Ranaut : सध्या अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) खासदार झाल्यानंतर एका वेगळ्या कारणामुळे बरीच चर्चेत आली आहे. विमानतळावर कंगनाच्या बाबतीत जे घडलं त्यावर अनेकांनी त्या घटनेचं समर्थन केल्याचंही पाहायला मिळालं. पण काहींनी या घटनेचा तीव्र निषेधही केला. पण कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेवर तीव्र निशेष व्यक्त केला आहे. ब्रिजभूषण सिंहविरोधात कुस्तीपटूंनी केलेलं आंदोलन चांगलच गाजलं. त्यामध्ये बजरंग पुनिया (Bajrang Puniya) हे नाव आघाडीवर होतं.
कंगना रणौतला चंदीगढ विमानतळावर एका CISF च्या महिला जवानाने कानशिलात लगावली. त्यानंत सोशल मीडियावर एकच खळबळ सुरु झाली. नवनिर्वाचित खासदाराला कानशिलात लगावल्यामुळे अनेकांनी या घटनेवर आक्षेप घेतला. त्यामुळे सध्या सगळीकडे या घटनेचे पडसाद उमटत आहेत. पण त्यावर बजरंग पुनियाने दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बजरंग पुनियाने काय म्हटलं?
बजरंग पुनियाने कंगनासोबत झालेल्या प्रकारावर एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, जेव्हा शेतकरी महिलांना वाईटसाईट बोललं जात होतं, तेव्हा नैतिकता शिकवणारे कुठे होते? आता त्याच किसान मातेच्या मुलीने गाल लाल केल्यावर शांती पाठ शिकवण्यासाठी पुढे आलेत. दरम्यान बजरंग पुनियाच्या या पोस्टमध्ये त्याने सरकारवरही जोरदार निशाणा साधला. तसेच त्याने या पोस्टमध्ये शेतकरी आंदोलनाचा देखील उल्लेख केलाय.
जब महिला किसानों के लिए अनाप शनाप बोला जा रहा था तब कहाँ थे नैतिकताएँ पढ़ाने वाले लोग! अब उस किसान माँ की बेटी ने गाल लाल कर दिया तो शांति का पाठ पढ़ाने आ गये. सरकारी जुल्म से किसान मारे गये उस समय यह शांति पाठ पढ़ाना था हुकूमत को!
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 7, 2024
—-
घटाएँ उठती हैं बरसात होने लगती है
जब आँख… pic.twitter.com/1311Ajedso
नेमकं प्रकरण काय?
कंगनाच्या राजकीय सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदिगड विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. सीआयएफएफच्या महिला जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. कंगनासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या महिला सीआयएसएफ जवानावर कारवाई करावी. शेतकरी आंदोलनावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सीआयएसएफ महिला जवान कंगनावर नाराज होती. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा निवडणुकीत कंगनाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर कंगना दिल्लीला रवाना झाली. याच दरम्यान चंदिगड विमानतळावर तिच्या कानशिलात लगावली असल्याचे वृत्त समोर आले. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिल्लीला जात असल्याचे सांगितले.