First Rapper in India : यो यो हनी सिंह नव्हे 'हा' आहे भारताचा पहिला रॅपर; जीवे मारण्याच्या धमकीमुळे सोडलेला देश
Baba Sehgal : बाबा सहगल हा भारताचा पहिला रॅपर (First Rapper in India) आहे. पण काही कारणाने त्याला भारत सोडावा लागला होता.
Baba Sehgal First Rapper in India : संगीतक्षेत्रात एकापेक्षा एक रॅपर आहेत. रॅप सॉन्गचा विषय निघाला की सर्वात आधी यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh), बादशाह (Badshah)आणि रफतारचा (Raftaar) चेहरा डोळ्यासमोर येतोच. पण यो यो हनी सिंह, बादशाह किंवा रफतारने भारतात रॅप सॉन्गची सुरुवात केलेली नाही. तर भारतात रॅप सॉन्गची सुरुवात करणारे व्यक्ती हे हरजीत सिंह सहगल उर्फ बाबा सहगल (Baba Sehgal) आहे. 'किंग ऑफ रॅप' (King Of Rap) म्हणून तो ओळखला जातो.
बाबा सहगलने 'या' कारणाने सोडलेला भारत
बाबा सहगलने 1990 रोजी रॅप सॉन्गची सुरुवात केली होती. त्याचे रॅप सॉन्ग चाहत्यांच्या पसंतीस उतरले. बाबा ज्यावेळी भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर होता त्याचवेळी त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला. बाबा सहगल यांचं करियर यशस्वी टप्प्यावर पोहोचलं होतं. त्याचवेळी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या यायला सुरुवात झाली. पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी गायक गुलशन कुमारची हत्या झाली. त्यानंतर मात्र बाबा सहगल यांनी आपलं करिअर सोडून सिंगापूर गाठलं.
मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर गाठल्यानंतर बाबा यांनी स्वत:ला संगीतापासून दूर केलं आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. रॅपर म्हणून कमवलेल्या पैशांचा वापर त्यांनी स्वत:च्या व्यवसायासाठी केला. पण व्यवसायात त्यांनी यश न मिळाल्याने त्यांनी पुन्हा भारतात येण्याचा विचार केला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे बाबा सहगल!
बाबा सहगल यांनी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीदेखील गाजवली आहे. बाबा भारतात आल्यानंतर कमबॅक करण्यासाठी त्यांना चिरंजीवीने मदत केली. यासंदर्भात बोलताना बाबा सहगल एका मुलाखतीत म्हणाले,"90 च्या दशकात मला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अनेक ऑफर येत असत. पण चिरंजीवी यांनी 'जलसा'च्या माध्यमातून मला टॉलिवूडचा रस्ता दाखवला. आजही माझ्यावर लोकांचा खूप विश्वास आहे. यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो".
बाबा सहगलबद्दल जाणून घ्या... (Who is Baba Sehgal)
बाबा सहगल यांनी 1990 मध्ये 'दिलरुबा' या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण 1992 मध्ये आलेला 'ठंडा ठंडा पानी' हा अल्बम सुपरहिट ठरला. हा त्याचा पहिला सुपरहिट अल्बम होता. एमटीव्ही एशियावर म्यूझिक व्हिडीओ ब्रॉडकास्ट करणारा तो पहिला भारतीय आर्टिस्ट होता. बाबा सहगलचे 'मैं भी मैडोना','बाबा बचाओ ना','डॉ. ढींगरा','मिस 420','इंडियन रोमियो' असे अनेक अल्बम सुपरहिट ठरले आहेत. तसेज एमटीव्हीच्या 'संता और बंता न्यूज अनलिमिटेड' या कार्यक्रमाचं सूत्रसंचानकही त्याने केलं आहे.
संबंधित बातम्या