एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दुबईत 'बाहुबली 2' प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

मुंबई : कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अनेक प्रेक्षक 'बाहुबली स्पॉयलर्स' टाळण्यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट्स, 'बाहुबली' हा शब्दही दिसणारे मेसेज किंवा बातम्या, रिव्ह्यूज टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुबईतील प्रेक्षकांना कटप्पाचं गुपित उलगडलं असून दुबईतील समीक्षकांनी चित्रपटाला 5 स्टार आणि स्टँडिंग ओव्हेशन दिलं आहे. बाहुबली 2 म्हणजे 'बाहुबली : द कन्क्ल्युजन'चा पहिला-वहिला रिव्ह्यू समोर आला आहे. उमैर साधू या यूके, यूएईमधील सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि समीक्षकाने सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. ट्विटरवर उमैरने दिलेल्या माहितीनुसार त्याने बाहुबली 2 ला पाच स्टार्स दिले आहेत. हॉलिवूडमधील लेजेंडरी चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि हॅरी पॉटरशी उमैरने बाहुबली 2 ची तुलना केली आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासवर त्याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय भल्लालदेव साकारणारा राणा डुग्गुबाती, रम्या कृष्णनने साकारलेली शिवगामी या व्यक्तिरेखाही मनावर छाप पाडून जात असल्याचं त्याने सांगितलं आहे. https://twitter.com/sandhumerry/status/857223459960569856 बाहुबली 2 मधील उत्तुंग सेट्स, व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर, ध्वनी, संकलन, छायाचित्रण यासारख्या तांत्रिक बाबींवरही उमैरने स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचप्रमाणे कथा, पटकथा, संवाद, संगीतही अत्युच्च दर्जाचं असल्याचं त्याने सांगितलं आहे. या चित्रपटाची भविष्यात क्लासिक्समध्ये गणना होईल, असा विश्वासही उमैरने व्यक्त केला आहे. यूएईच्या सेन्सॉर बोर्डाने बाहुबली 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर उभं राहून टाळ्या वाजवल्याचा उल्लेखही त्याने एका ट्वीटमध्ये केला आहे. https://twitter.com/sandhumerry/status/857174066767290369 विनोद खन्ना यांच्या निधनामुळे प्रीमियर शो रद्द विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवारी होणारा बाहुबली-२ चा प्रिमियर शो रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  बाहुबलीच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. "विनोद खन्ना यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी दु:खात आहे, आम्हीही या दु:खात सहभागी असून, आजचा बाहुबलीचा प्रीमियर शो रद्द करत आहोत." असं बाहुबलीच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग' 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग'च्या री-रिलिजला पहिल्या तीन दिवसात अवघ्या दोन कोटींचा गल्ला जमवता आला. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

संबंधित बातम्या

'बाहुबली 2' मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

'बाहुबली 2' चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली'कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget