Ayushmann's Father Demise: अभिनेता आयुष्मान खुरानाला पितृशोक; पी खुराना यांचे निधन
आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील पी खुराना (P Khurrana) यांचे निधन झाले आहे.
Ayushmann Khurrana Father Pandit P Khurana Passes Away: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana) यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. पी खुराना यांच्यावर मोहालीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (19 मे) त्यांचे निधन झाले.
आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या वतीने त्यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन म्हटलं आहे की, 'आम्हाला कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10.30 वाजता मोहाली येथे निधन झाले आहे. तुमच्या प्रार्थनेसाठी आणि सपोर्टसाठी आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत.'
आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5.30 वाजता चंदीगडमधील मणिमाजरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
पी खुराना यांची आयुष्मान आणि अपारशक्ती ही दोन्ही मुलं अभिनेते आहेत. आयुष्मान हा अनेकदा त्यांच्या वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. काही वर्षांपूर्वी आयुष्माननं सोशल मीडियावर पी खुराना यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं,'माझे ज्योतिषी बाबा पी. खुराना. कृपया माझ्या नावाच्या वेगळ्या स्पेलिंगसाठी त्यांना दोष द्या. मला आठवते की, माझ्या शाळेत नावाचे वेगळे स्पेलिंग असलेला मी एकमेव होतो.' पी खुराना यांनी आयुष्मानला त्याच्या नावाचे स्पेलिंग बदलण्यास सांगितले होते.
एका पोस्टमध्ये आयुष्माननं पी खुराना यांच्याबाबत लिहिलं होतं, 'लहानपणी मला वडिलांनी घातलेली बंधने तोडायला मजा यायची आणि आता मोठे झाल्यावर स्वतःवर घातलेली बंधने मला मोडता येत नाहीत'
View this post on Instagram
आयुष्मानचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयुष्मान हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: