Avatar 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर निळ्या विश्वाची जादू कायम; 'अवतार 2' ठरला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
Avatar 2 : 'अवतार 2' या हॉलिवूड सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.
Avatar The Way Of Water Box Office Collection : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हॉलिवूडच्या या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला आहे.
'अवतार' (Avatar) या सिनेमाचा पहिला भाग 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता 12 वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar 2) या सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, व्हीएफएक्स अशा सर्वचं गोष्टींनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'अॅव्हेंजर्स एण्डगेम'चा रेकॉर्ड मोडला
'अवतार 2' या सिनेमाने 'अॅव्हेंजर्स एण्डगेम' (Avengers Endgame) या बहुचर्चित सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'अॅव्हेंजर्स एण्डगेम' या सिनेमाने भारतात 367 कोटींची कमाई केली होती. तर आता 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने भारतात 368 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Avatar 2 Box Office Collection)
- पहिला आठवडा - 182.90 कोटी
- दुसरा आठवडा - 98.49 कोटी
- तिसरा आठवडा - 54.53 कोटी
- चौथा आठवडा - 21.53 कोटी
- पाचवा आठवडा - 9.45 कोटी
- सहावा आठवडा - 1.30 कोटी
- एकूण - 368.20 कोटी
View this post on Instagram
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा भारतात 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे आणखी तीन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'अवतार 3' हा सिनेमा 20 डिसेंबर 2024, 'अवतार 4' 18 डिसेंबर 2026 आणि अवतारचा चौथा भाग 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. त्यामुळे निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या अनुभवता येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :