OTT : प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार 'हे' सिनेमे
OTT : सिनेमागृहात प्रदर्शित झालेले सिनेमे प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येणार आहेत.
OTT : सिनेमागृहात प्रदर्शित झालेले सिनेमे प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येणार आहेत. नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला 'बधाई दो' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. लवकरच '83' आणि 'राधे श्याम' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
बधाई दो (Badhaai Do) : 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला 'बधाई दो' (Badhaai Do) सिनेमा महिनाभरानंतर 11 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून हर्षवर्धन कुलकर्णी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
83 : रणवीर सिंहचा 83 सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी रणवीरला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
View this post on Instagram
राधे श्याम (Radhe Shayam) : 'राधे श्याम' सिनेमा 11 मार्चला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. लवकरच हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 2 एप्रिलला हा सिनेमा ओटीटीवर येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित बातम्या
Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
Vatsala Deshmukh : जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड, ‘पिंजरा’ चित्रपटात साकारली होती खलनायिका
The Kashmir Files : पहिल्याच दिवशी 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जादू, सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना अश्रू अनावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha