Article 370 Movie : PM मोदींनी कौतुक केलेल्या 'आर्टिकल 370' चित्रपटाला मोठा धक्का, आखाती देशांमध्ये बंदी
Article 370 Movie Ban : पीएम मोदींनी कौतुक केलेला 'आर्टिकल 370' हा चित्रपटाला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटावर आखाती देशांनी बंदी घातली आहे.
![Article 370 Movie : PM मोदींनी कौतुक केलेल्या 'आर्टिकल 370' चित्रपटाला मोठा धक्का, आखाती देशांमध्ये बंदी Article 370 movie updates Yami Gautam Article 370 movies gets banned in Gulf countries Article 370 Movie : PM मोदींनी कौतुक केलेल्या 'आर्टिकल 370' चित्रपटाला मोठा धक्का, आखाती देशांमध्ये बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/26/777c174d7785a1f1ed0ba568d1b61cee1708934482066290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Article 370 Movie Ban : अभिनेत्री यामी गौतमची (Yami Gautam) प्रमुख भूमिका असलेला 'आर्टिकल 370' चित्रपटाला (Article 370 Movie) बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध कारणांनी हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटात जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद 370 आणि दहशतवादी कारवायांबाबत भाष्य करण्यात आले. या चित्रपटाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले होते. या चित्रपटाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटावर आखाती देशामध्ये बंदी (Article 370 Movie Ban In Gulf Countries) घालण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
आखाती देशांमध्ये 'आर्टिकल 370' चित्रपटावर बंदी
आखातीमधील इराक, कुवैत, बहरीन, ओमान, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त अरब अमिराती आदी देशांमध्ये ‘आर्टिकल 370’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटावर बंदी घालणे ही इंडस्ट्रीसाठी निश्चितच धक्कादायक आहे. आखाती देशांमध्ये बॉलीवूड चित्रपटांची खूप क्रेझ आहे आणि हिंदी चित्रपटांना येथे चांगला प्रतिसाद मिळतो. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग आखाती देशांमध्येही झाले आहे. अशा परिस्थितीत येथे 'कलम 370' वर बंदी घालणे आश्चर्यकारक आहे. मात्र, याआधी हृतिक रोशन स्टारर फायटर या चित्रपटावर UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती.
पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू येथील एका सभेत यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, आर्टिकल 370 वर कोणता तरी चित्रपट येणार आहे, असे समजले. या निमित्ताने आता लोकांना सत्य माहित समजेल असेही त्यांनी म्हटले होते. पीएम मोदींनी उल्लेख केल्याने या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तर, यामी गौतमनेही पीएम मोदींचे आभार मानले होते.
View this post on Instagram
'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिसवर करतोय दमदार कामगिरी
चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसांतच खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.12 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 9.8 कोटींची कमाई केली तर रविवारी या चित्रपटाने 10.5 कोटींची कमाई केली. यानंतर, 'आर्टिकल 370' ची तीन दिवसांची एकूण कमाई आता 34.71 कोटी रुपये झाली आहे.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)