Article 370 Movie Review : यामी गौतमची कधीही न पाहिलेली झलक, Article 370 आहे कसा? वाचा रिव्ह्यु
Article 370 Movie Review : बॉलीवूडची अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेला Article 370 हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Aditya Jambhale
Yami Gautam, Vaibhav Tatwawadi, arun govil, PriyaMani
Article 370 Movie Review : काही चित्रपट हे चांगले असतात, काही खूप चांगले असतात आणि काही त्या पलिकडे असतात. Article 370 हा चित्रपटही बऱ्याच पलिकडे आहे. या चित्रपटात यामी गौतमची (Yami Gautam) एक नवी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. तिने तिचं दमदार कमबॅक केलंय. काश्मीरवर याआधीही बरेच चित्रपट झाले आहेत, पण Article 370 हा चित्रपट कमाल आहे. अॅक्शन आणि इमोशन्स या दोघांचा बॅलन्स या चित्रपटात योग्य रितीने साकारण्यात आलाय. त्यामुळे नक्की पाहावा असा हा चित्रपट आहे.
कथा - देशाचा इतिहास सांगणारे अनेक चित्रपट आतापर्यंत बॉलीवूडमध्ये तयार झाले आहेत. पंरतु ज्याची वाट प्रेक्षक बऱ्याच काळापासून पाहत होते असा हा Article 370 चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झालाय. यामी गौतमच्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. काश्मीरमध्ये कशाप्रकारे Article 370 हटवण्यात आले आणि तेव्हा सरकारला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला या विषयीचे चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात यामीचा काश्मीरी अंदाज पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात काश्मीरच्या सुंदर अशा घाटांपासून सुरुवात करण्यात आलीये आणि त्यानंतर ही गोष्ट छान पद्धतीने पुढे गेली आहे. ज्यांना कलम 370 खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे आहे आणि त्यावेळची परिस्थिती जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अरुण गोविल खूपच छान दिसत आहेत. तसेच, जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला काश्मीर आणि कलम 370 अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल.
अभिनय - यामी गौतमने उत्कृष्ट काम केले आहे, तिने संपूर्ण चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना खिळवून ठेवले आहे.यामीचा हा ॲक्शन मोड तुमच्या मनावर वेगळी छाप सोडेल. तर अरुण गोविल यांनी पंतप्रधानांची भूमिका केली आहे आणि ते स्वतःच कौतुकास्पद आहेत. तसेच प्रियामणी, वैभव तत्ववादी, किरण कर्माकर आणि राज झुत्शी यांनी सहाय्यक भूमिका उत्तम केल्या आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्र स्वतःच अप्रतिम आहे.
दिग्दर्शन - आर्टिकल 370 या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले असून त्यांना या चित्रपटातून काय सांगायचे होते तेही उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. त्यांची चित्रपटावरील पकड दिसून येते आणि हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जाईल आणि हे देखील अप्रतिम दिग्दर्शनामुळे. एकूणच हा चित्रपट अजिबात मिस करु नका.