Article 370 Special Offer : 'आर्टिकल 370 'वर बंपर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहा चित्रपट; जाणून घ्या कसं आणि कधी मिळणार तिकीट
Article 370 Special Offer : यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे.
![Article 370 Special Offer : 'आर्टिकल 370 'वर बंपर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहा चित्रपट; जाणून घ्या कसं आणि कधी मिळणार तिकीट Article 370 Movie offer Special offer from producers of Article 370 buy movie tickets from 99 rs Yami Gautam starrer produced by Jio Studios and Aditya Dhar Article 370 Special Offer : 'आर्टिकल 370 'वर बंपर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहा चित्रपट; जाणून घ्या कसं आणि कधी मिळणार तिकीट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/6f7a9fc6e0b3f30ce0758d3748cf81651708428412804290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Article 370 Special Offer : अभिनेत्री यामी गौतमची ( Yami Gautam) प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370' (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरवर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. या चित्रपटाबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे. या चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांना मिळणार आहे.
'आर्टिकल 370'वर बंपर ऑफर
'आर्टिकल 370'च्या निर्मात्यांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी खास ऑफर लाँच केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'आर्टिकल 370'मध्ये यामी गौतम ही एनआयए अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रियामणि, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'आर्टिकल 370' या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
काश्मीरमध्ये रिलीज होणार नाही
संवेदनशील मुद्यावर भाष्य करणाऱ्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाबद्दल रिलीज आधीच मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. यामी गौतमच्या या चित्रपटात जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याबाबतची गोष्ट दाखवली जाणार आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित होणार नाही.
View this post on Instagram
याबाबत निर्माता आदित्य धर यांनी सांगितले की, आम्ही आधी हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. मात्र, सध्या यामी गरोदर असल्याने तिला अधिक प्रवास करायचा नाही.
यामी-आदित्यच्या घरी येणार नवा पाहुणा
यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. यामी गौतम ही सध्या गरोदर आहे. 'आर्टिकल 370'च्या ट्रेलर लाँचच्या वेळी दाम्पत्याने ही माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)