एक्स्प्लोर
कुख्यात डॉन अरुण गवळीच्या जीवनावरील हिंदी सिनेमा 'डॅडी'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीच्या जीवनावरील 'डॅडी' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल डॉन अरुण गवळीची भूमिका साकारत आहे. या सिनेमासाठी अर्जुनने चांगलीच मेहनत घेतल्याचे सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसतंय.
अरुण गवळीचा 'डॉन' ते राजकीय नेत्यापर्यंतचा प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सिनेमातून अरुण गवळीची इमेज सुधारणाचा प्रयत्न होणार नसल्याचं या आधीच अर्जुनने स्पष्ट केलं होतं. या सिनेमाची सुरुवात 1970 सालातील ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिन्सने होते.
दरम्यान, या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारण्यासह अर्जुन रामपाल या सिनेमाची निर्मितीही करत आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन असीम आहलुवालिया यांनी केलं आहे. या सिनेमाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केलं होतं.
सिनेमात अर्जुनसह फरहान अख्तर आणि ऐश्वर्या राजेश मुख्य भूमिकेत आहेत. ऐश्वर्याने या सिनेमात अर्जुनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. याशिवाय काही मराठी कलाकारही या सिनेमातही प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी अरुण गवळीच्या जीवनावरील दगडी चाळ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळीची भूमिका साकारली होती.
सिनेमाचा ट्रेलर पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement