एक्स्प्लोर
अरबाज खानला सनी लिओनीसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा
बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनीसोबत अभिनेता अरबाज खानला आणखी एक सिनेमा करण्याची इच्छा आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने ही इच्छा व्यक्त केली.
मुंबई : बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनीसोबत अभिनेता अरबाज खानला आणखी एक सिनेमा करण्याची इच्छा आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने ही इच्छा व्यक्त केली.
‘तेरा इंतजार’मध्ये अरबाज खान मुख्य भूमिका साकारत असून, सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजला याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला की, “जर मला सनी लिओनीसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्यास, तर ते मला आवडेल.”
विशेष म्हणजे, दबंग-3 चं शूटिंग 2018 च्या मध्यावधीमध्ये सुरु होणार असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. तसेच या सिनेमासाठी सनी लिओनाची गरज असल्यास निश्चितच तिचं कास्टिंग केलं जाईल, असंही अरबाजनं यावेळी स्पष्ट केलं.
त्यामुळे तेरा इंतजार सिनेमानंतर दबंग 3 मध्येही सनी लिओनी अरबाज सोबत मुख्य भूमिका साकारताना दिसू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement