एक्स्प्लोर
वायरल फोटोंवर पहिल्यांदाच मौन सोडलं, अनुष्का शर्मा म्हणते...
ट्रोलिंगची ही ‘सुई’ सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माला टोचत आहे. तेही तिच्या आगामी सिनेमा ‘सुई धागा’मुळे. यावर तिने आता पहिल्यांदाच रिअॅक्शन दिली आहे.
मुंबई : सोशल मीडिया म्हणजे सध्या ट्रोलिंगचा मोठा प्लॅटफॉम बनतोय. कोणत्याही कारणामुळे कोणीही कोणालाही अगदी सहज ट्रोल करु शकतं. ट्रोलिंगची ही ‘सुई’ सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माला टोचत आहे. तेही तिच्या आगामी सिनेमा ‘सुई धागा’मुळे.
या सिनेमातील अनुष्का शर्माचा एक लूक, ज्यामध्ये ती चेहऱ्याला हात लावून, रडका चेहरा करुन बसलेली आहे, तो वायरल होत आहे. यावर आता सिनेमातील अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिला आहे.
अनुष्काचा हा फोटो फोटोशॉप करुन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वायरल करत आहे. ट्विटरवर एक जणाने एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्याला कोट करत वरुण धवनने रिप्लाय दिला. ‘मीम्सकीराणी ममता’ असा रिप्लाय देत तो हसण्यापासून स्वतःलाही रोखू शकला नाही.#MEMESkirani #mamta hhahaha https://t.co/vtaLSUf1lP
— Varun MAUJI Dhawan (@Varun_dvn) August 29, 2018
वरुण धवनच्या या ट्वीटला अनुष्कानेही रिप्लाय दिला. जबरदस्त असं म्हणत अनुष्कालाही हसू आवरलं नाही.😆😆👏 superbbbb !! https://t.co/bwuq4p1hwT
— Anushka Sharma (@AnushkaSharma) August 29, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement