Anushka Sharma : अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसचं Amazon, Netflix सोबत 400 कोटीचं डील; रिलीज होणार हे चित्रपट, वेब सीरिज
अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसनं नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन (Amazon) या कंपन्यांसोबत डील केले आहे.
Anushka Sharma Production House : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अभिनय क्षेत्राबरोबरच निर्मीती क्षेत्रातही काम करत आहे. अनुष्काचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. तिच्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव क्लीन स्लेट फिल्म्स प्राइव्हेट असं आहे. नुकतीच अनुष्काच्या या प्रोडक्शन हाऊस कंपनीनं मोठं डील साइन केले. हे डील क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शन हाऊसनं नेटफ्लिक्स (Netflix) आणि अॅमेझॉन (Amazon) या कंपन्यांसोबत केली.
रिपोर्टनुसार अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसनं नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनसोबत जवळपास 400 कोटी म्हणजेच 54 मिलियन डॉलरचं डील केली आहे. स्लेट फिल्म्स प्रोडक्शन हाऊस हे येत्या 18 महिन्यात त्यांचे आठ चित्रपट आणि वेब सीरिज हे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफोर्मवर स्ट्रीम करणार आहेत. याबाबत नेटफ्लिक्सनं या प्रोडक्शन हाऊससोबतच्या तीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. पण अॅमेझॉननं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
अनुष्काच्या क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव एनएच 10 असं आहे. या चित्रपटात अनुष्काने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच फिल्लोरी आणि परी या चित्रपटाची निर्मिती देखील या प्रोडक्शन हाऊसनं केली आहे. तसेच अनुष्का तिचे 'काला' आणि 'चकदा एक्सप्रेस' हे आगामी चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटत अनुष्का क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Republic Day 2022 : बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा; शेअर केली पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha