Tollywood Actors : अल्लू अर्जुन ते महेश बाबू ; हे दाक्षिणात्य स्टार्स एका चित्रपटाचे घेतात एवढे मानधन
Tollywood Actors : दाक्षिणात्य स्टार्स हे चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेऊयात...
Tollywood Actors : सध्या बॉलिवूड बरोबरच टॉलिवूडमधील चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे कथानक, अॅक्शन, ड्रामा या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. बॉलिवूड कलाकार हे एका चित्रपटासाठी कोट्यवधींचे मानधन घेतात हे अनेकांना माहित असेल पण दाक्षिणात्य स्टार्स हे चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेऊयात...
अल्लू अर्जुन (Allu Arjun)
पुष्पा चित्रपटाच्या यशामुळे सध्या अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) चर्चेत आहे. पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहाद फासिल या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर आता तो आणखी एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.रिपोर्टनुसार अल्लू अर्जुननं या चित्रपटात काम करण्यासाठी 100 कोटी रूपये मानधन घेतले.
ज्यूनियर एनटीआर (Jr NTR)
अभिनेता ज्यूनियर एनटीआरचा आरआरआर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी त्यानं 45 कोटी रूपये मानधन घेतले आहे. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ज्यूनियर एनटीआरसोबत अजय देवगण, आलिया भट्ट, आणि राम चरण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या आधी ज्यूनियर एनटीआर एका चित्रपटाचे 25 ते 30 कोटी मानधन घेत होता.
महेश बाबू (Mahesh Babu)
अभिनेता महेश बाबूनं बालकलाकार म्हणून काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रिपोर्टनुसार महेश बाबू हा एका चित्रपटाचे 20 ते 30 कोटी रूपये मानधन घेतो.
हे देखील वाचा-
Arjun Kapoor : ' ती मला पाहतेय'; अर्जुनला येते आईची आठवण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha