Anushka Sharma: हेल्मेट न घालता बाईक चालवणं अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डला पडलं महागात; भरावा लागला दंड
मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) बाईक चालवणाऱ्या सोनू शेखला दंड ठोठावला आहे.
Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूसोबत मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसली होती. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. त्यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भरावा लागला आहे.
अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी बाईक चालवणाऱ्या सोनू शेखला 10,500 रुपयांचा दंड ठोठावला असून त्याच्याविरुद्ध कलम 129/194, कलम 5/180 आणि कलम 3(1)18 अंतर्गत चलानही जारी करण्यात आले आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटमध्ये अशी माहिती दिली आहे की, सोनू शेखनं हा दंड भरला आहे.
Challan has been issued under Sec 129/194(D), Sec 5/180 & Sec 3(1)181 MV act to the driver along with an fine of Rs. 10500 & been paid by the offender. https://t.co/aLp6JEstLO pic.twitter.com/Br0ByHZk4T
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2023
अनुष्का आणि तिचा बॉडीगार्ड सोनू शेख यांच्या बाईक राइडचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केले होते. सोनू शेख आणि अनुष्का यांनी हेल्मेट घातला नसल्यानं अनेक जण त्यांच्यावर टीका करत होते.
बिग बींनी देखील केली बाईक राईड
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे आणि त्या बाईकच्या बॅक सिटवर अमिताभ बच्चन बसलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये बिग बी आणि त्या व्यक्तीनं हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केले.
अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्का ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर जवळपास 63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. आता अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anushka Sharma : बिग बींपाठोपाठ अनुष्का शर्माची बाईक राईड; हेल्मेट न घातल्याने नेटकरी संतापले