Anupam Kher : "प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार"; शेतकरी आंदोलनावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
Anupam Kher : हिंदी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'Everyone has the right to protest but..': Anupam Kher reacts to ongoing farmers' protests
Anupam Kher : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. लवकरच त्यांचा 'कागज 2' (Kaagaz 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अनुपम खेर म्हणाले की,"कोणत्याही कलाकाराने एका कार्यकर्त्याप्रमाणे काम नाही केलं पाहिजे. विरोध करणाऱ्या गोष्टींमध्येही माझा सहभाग होता. निदर्शने आणि रॅलींमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या समस्यांवर आधारित हा सिनेमा आहे. वीके प्रकाश यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अनुपम खेर म्हणाले,"मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना योद्धा मानले जात नाही. ज्या गोष्टीचा मला त्रास झाला आहे आणि त्याचे परिणाम भोगले आहे. त्या सर्व गोष्टींबद्दल मी वैयक्तिकरित्या बोललो आहे. त्यामुळे अनेकांना मी आवडत नाही. पण या गोष्टीचा मला फरक पडत नाही. त्यामुळे दिवसाच्या शेवटी मला शांत झोप लागते".
View this post on Instagram
अनुपम खेर पुढे म्हणाले,"एखादी समस्या सोडवण्याचा आदर्श मार्ग म्हणजे संवाद आहे. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे आपण स्वतंत्र देश आहोत. भारत छोडो आंदोलन, असहकार आंदोलनाचे आपण फलित आहोत, पण त्यावेळी सर्व देशवासी एकत्र होते, ते सर्वांसाठी होते आणि केवळ काही लोकांना मदत करण्यासाठी नव्हते".
प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे : अनुपम खेर
शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले,"प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होऊ नये. प्रत्येकाला चळवळीचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. परंतु इतरांची गैरसोय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्या देशात सध्या असेच घडत आहे.
शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना अनुपम खेर पुढे म्हणाले,"शेतकरी अन्नदाता आहे. आपण अन्नदाताबद्दल बोलत आहोत असे सांगून आपल्याला बचावात्मक वाटू लागले आहे…मला वाटते की आपण जो कर भरतो ते देशाच्या वाढीस हातभार लावत आहेत. सर्वसामान्यांचे जीवन दयनीय करणे योग्य नाही असे मला वाटते".
संबंधित बातम्या