Ankita Lokhande Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडेचा 'बिग बॉस'च्या घरात सुशांतसिंह राजपूतबाबत मोठा दावा, म्हणाली..
Ankita Lokhande Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडेने ब्रेकअपनंतर दीड वर्ष सुशांत सिंह राजपूतची वाट पाहिली होती.
Ankita Lokhande Sushant Singh Rajput : 'अधूरी प्रेम कहानी' असं जेव्हा-जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आठवण येते. आता 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) कार्यक्रमात अंकिताने सुशांत सिंह राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतने 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2016 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर 2020 मध्ये सुशांतचं निधन झालं आणि इंडस्ट्रीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.
ब्रेकअपनंतर दोन वर्ष अंकिताने पाहिलेली सुशांतची वाट
'बिग बॉस 17'मध्ये सुशांतबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,"सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर मी दीड वर्षे त्याची वाट पाहिली आहे. पुन्हा सुशांत आणि माझं नातं पूर्वीसारखं होईल असं मला वाटत राहायचं. पण दीड वर्षांनी 31 जानेवारीच्या दिवशी मी सुशांतला विसरायचा निर्णय घेतला. माझ्या घरी आम्हा दोघांचे एकत्र असलेले फोटो मी आईला हटवायला सांगितले. त्यानंतर आईने ते सर्व फोटो फाडून टाकले. खरंतर त्यावेळी मला अश्रू अनावर झाले होते".
सुशांतची मी खूप वाट पाहिली : अंकिता लोखंडे
अंकिता पुढे म्हणाली की,"सुशांत सिंह राजपूतची जोपर्यंत मला आठवण येतेय तोपर्यंत माझ्या आयुष्यात दुसरं कोणाची एन्ट्री होणार नाही, असं त्यावेळीच मी माझ्या आईला सांगितलं होतं. सुशांतची मी खूप वाट पाहिली. सुशांतला विसरल्यानंतर माझ्या आयुष्यात विकी जैनची (Vicky Jain) एन्ट्री झाली. अंकिता लोखंडे आणि विकी जैन डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.
'बिग बॉस 17'च्या कार्यक्रमात अंकिताने तिचा ब्रेकअप कसा झाला याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या मते एका रात्रीत त्यांचं नातं संपलं आहे. अभिनेत्री म्हणाली होती,"एका रात्रीत सुशांत माझ्या आयुष्यातून गेला आहे. सुशांत त्याच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होत होता. नातं संपवताना त्याने त्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. मीदेखील त्याचा ब्रेकअपचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला आहे". अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 2020 मध्ये मुंबईतील त्याच्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात आता अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेत्रीने अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केलं आहे.
संबंधित बातम्या