एक्स्प्लोर

Animal : रणबीर-रश्मिकाच्या 'ॲनिमल' सिनेमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; इंटीमेट दृश्यांवर आक्षेप

Animal Update : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' रिलीज होण्याआधी सिनेमात काही बदल करण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

Ranbir Kapoor Rashmika Mandanna Animal Update : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रणबीर-रश्मिकाच्या 'अॅनिमल' सिनेमातील इंटीमेट दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. 

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' या सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सिनेप्रेमी आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'अॅनिमल' या सिनेमात रणबीर-रश्मिकाचे अनेक किसिंग सीन्स होते. पण आता सिनेमातील या दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

'अॅनिमल'वर सेन्सॉर बोर्डाची कात्री (Censor Board cut intimate scene of Ranbir Kapoor and Rashmika Mandanna)

रणबीरच्या 'अॅनिमल'ची सध्या सर्वत्र चांगलीच क्रेझ आहे. नुकताच रणबीरने या सिनेमाचा प्री-रिलीज इवेंट आयोजित केला होता. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी प्री-रिलीजला आपली उपस्थिती दर्शवली होती. आता सेन्सॉरने 'अॅनिमल' सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यासोबत काही दृश्य हटवण्याचे निर्देश दिले आहेत. रणबीर-रश्मिकाच्या क्लोज अप सीन्ससह अनेक संवादही हटवण्यास सांगितलं आहे. तसेच काही शब्ददेखील बदलण्यास सांगितले आहेत. 'अॅनिमल' हा सिनेमा 18 वर्षांपुढील सिनेरसिकांना पाहता येणार आहे. 

'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अॅनिमल (Animal Release Date)

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी जगभरातील सिनेरसिक उत्सुक आहेत. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Boby Deol) नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा लूक खूपच खतरणार आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवायला आता सज्ज आहे.

'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगाने (Sandeep Reddy Vanga) सांभाळली आहे. वडील-मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी या सिनेमात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. येत्या 1 डिसेंबरला हा सिनेमा हिंदीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. रणबीरच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

Animal Advance Booking : रणबीरच्या 'ॲनिमल'चा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका; रिलीजआधीच केली कोट्यवधींची कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget