एक्स्प्लोर
VIDEO : अनिल कपूरने ऐश्वर्याचं नाव घेताच सलमानची रिअॅक्शन...
याशिवाय जेव्हा शोमध्ये ऐश्वर्या रायवर चित्रित झालेलं 'जवां है मोहब्बत' गाणं सुरु झालं, त्यावेळीही सलमानच्या चेहऱ्यावर हास्य होतं.
मुंबई : अभिनेता अनिल कपूर नुकताच सलमान खानच्या 'दस का दम' या शोच्या सेटवर त्याच्या आगामी 'फन्ने खान'च्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी एक असा क्षण आला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. अनिल कपूरने सलमान खानसमोर ऐश्वर्या रायचं नाव घेतलं तो हा क्षण होता. त्यावेळी सलमानची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. शोमध्ये उपस्थित प्रेक्षकही जोरजोरात ओरडू लागले.
अनिल कपूरसोबत पीहू संदही प्रमोशनच्या वेळी उपस्थित होती. फन्ने खानमध्ये ती अनिल कपूरच्या मुलीच्या भूमिकेत आहे. सिनेमाबाबत सांगताना अनिल म्हणाला की, "आमची जी लता आहे ती बेबी सिंहची मोठी चाहती आहे, बेबी सिंहची भूमिका ऐश्वर्या राय साकारत आहे." तेव्हा सलमान खान म्हणाला, "अच्छा". यावर प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले आणि ओरडू लागले. मग अनिल कपूर म्हणतो, "ऐश्वर्या राय बच्चन." यावेळी सलमान हसताना दिसतो.
याशिवाय जेव्हा शोमध्ये ऐश्वर्या रायवर चित्रित झालेलं 'जवां है मोहब्बत' गाणं सुरु झालं, त्यावेळीही सलमानच्या चेहऱ्यावर हास्य होतं. महत्त्वाची बाब म्हणजे ऐश्वर्या आणि राजकुमार राव हे प्रमोशनसाठी उपस्थित नव्हते. ऐश्वर्या आणि सलमानचा इतिहास तर जगजाहीर आहे. एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असणारे सलमान आणि ऐश्वर्या आता एकमेकांसमोर येणंही टाळतात. एक वडील आपल्या मुलीचं गायिका बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण करतो, अशी 'फन्ने खान'ची गोष्ट आहे. सिनेमात अनिल कपूर आणि पीहू संद यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अतुल मांजरेकर दिग्दर्शित 'फन्ने खान' 3 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मोठ्या काळानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement