Anil kapoor : गंभीर आजाराशी झुंज देत आहेत अनिल कपूर? व्हिडीओ केला शेअर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर ( Anil kapoor) त्यांच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात.

Bollyowod Actor Anil kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर ( Anil kapoor) त्यांच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनिल कपूर हे सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच जर्मनीमधील व्हिडीओ अनिल कपूर यांनी शेअर केला. या व्हिडीओला अनिल यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
व्हिडीओमध्ये जर्मनीमधील एका रस्त्यावर अनिल कपूर हे फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले, 'बर्फ पडत असताना केलेला पर्फेक्ट वॉक . जर्मनीमधील माझा हा शेवटचा दिवस. माझ्या उपचाराचा शेवटचा दिवस असून मी डॉ. म्युलर भेटायला जात आहे.'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले होते, 'ऍचिलीस टेंडिनाइटिसने (Achilles Tendinitis) या आजाराशी दहा वर्षांपासून मी झुंज देत आहे. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितले होते की, या आजारावर शस्त्रक्रिया करणे हाच माझा एकमेव उपचार आहे. पण डॉक्टर म्युलर यांच्यामुळे मी कोणतीही सर्जरी न करता पळू शकतो, तसेच दोरी वरच्या उड्या देखील मारू शकतो.'
View this post on Instagram
83 Teaser Out: बहुचर्चित '83' चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती
मलंग, टोटल धमाल आणि दिल धडकने दो या चित्रपटांमधील अनिल कपूरच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांचा एके वर्सेस एके हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अनिल यांच्या हटके अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
