एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : जेवणासाठी 210 कोटी, अंबानींच्या प्री वेडिंगवर किती हजार कोटींचा चुराडा? विराटची तेवढी संपत्ती नाही!

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लाडका लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगवर लाखो रुपये खर्च केले आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. लाडक्या लेकाच्या प्री-वेडिंगवर अंबानींनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता लग्नात अंबानी किती कोटी खर्च करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगला जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. यात मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, रिहाना, एकॉन, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी अशा अनेक मंडळींचा सहभाग आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. 

अंबानींनी प्री-वेडिंगवर किती कोटी खर्च केले? (Anant-Radhika Pre-Wedding Function Budget)

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगवर एकूण 120 मिलियन डॉलर म्हणजेच 1259 कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्वसामान्यांसाठी ही मोठी रक्कम असली तरी मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र ही रक्कम जास्त नाही. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 9.7 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) एकूण संपत्ती 1050 कोटी रुपयांच्या आसपास आहे. जगातील सर्व क्रिकेटपटूंपेक्षा त्याची संपत्ती सर्वाधिक आहे. आता विराटच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त रक्कम अंबानींनी प्री-वेडिंगवर खर्च केल्याचं पाहायला मिळत आहे.

जेवणावर 210 कोटी रुपये खर्च

अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये फक्त जेवणावर 210 कोटी रुपये खर्च केले आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, जगभरातील लोकप्रिय सेलिब्रिटी रिहानाने आपल्या धमाकेदार सादरीकरणासाठी 8-9 मिलियन म्हणजेच 66-75 कोटी रुपये आकारले होते. 

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात या कार्यक्रमाची भव्यता दिसून येत आहे. प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खान, एमएस धोनी, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अत्यंत दिमाखदार अशा या कार्यक्रमाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता अनंत-राधिकाच्या लग्नाची लोकांना उत्सुकता आहे.

ईशा अंबानीच्या लग्नापेक्षा महागडं प्री-वेडिंग

ईशा अंबानी आणि आनंद पीरामल 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यामुळे अंबानींनी लेकीच्या लग्नावर फक्त 828 कोटी रुपये खर्च केले होते. ईशाच्या लग्नापेक्षा महागडं तिच्या भावाचं प्री-वेडिंग ठरलं आहे.

संबंधित बातम्या

Radhika Merchant : अंबानीच्या सूनेनं भर कार्यक्रमात एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
Embed widget