एक्स्प्लोर
Advertisement
अक्षयकुमारच्या बहुप्रतिक्षित 'केसरी'चा ट्रेलर प्रदर्शित, 21 शीख सैनिकांची शौर्यगाथा
सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट 1897 च्या सारागढी लढाईवर बेतलेला आहे. या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या 21 शीख सैनिकांनी 10 हजार अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडले होते.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'केसरी'चा ट्रेलर आज सकाळी 11 वाजता प्रदर्शित झाला. निर्माता करण जोहर आणि अक्षय कुमारनं ट्विट करत याबाबत माहिती दिली. सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट 1897 च्या सारागढी लढाईवर बेतलेला आहे. या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या 21 शीख सैनिकांनी 10 हजार अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडले होते. ही लढाई भारताच्या इतिहासातील कठीण लढायांपैकी एक ठरली होती.
12 फेब्रुवारीला अक्षय कुमारनं सोशल मीडियावर केसरीची पहिली झलक शेअर केली होती. आज केसरीचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही त्यावेळी केली होती. केसरी हा एक युद्धपट असून याची कथा गिरीश कोहली आणि अनुराग सिंह यांनी लिहिली आहे. यात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 36 व्या शीख रेजिमेंटचे 21 सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर ‘केसरी’ चित्रपट आधारित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या 21 सैनिकांची अविश्वसनीय शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पड्यावर पहायला मिळाणार आहे. ‘केसरी’च्या रिलीजची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.An incredible true story of valour, sacrifice & bravery - told like never before! #KesariTrailer out now - https://t.co/eDqk8Lts6t@ParineetiChopra @SinghAnurag79 @karanjohar @apoorvamehta18 @SunirKheterpal @DharmaMovies #CapeOfGoodFilms @iAmAzure @ZeeStudios_ #Kesari
— Akshay Kumar (@akshaykumar) February 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement