![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना चिंता सतावतेय! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'मला असहाय्य वाटतंय'
Kaun Banega Crorepati 16 : आता पुन्हा बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये 'मला असहाय्य वाटतंय', असं म्हटलं आहे.
![Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना चिंता सतावतेय! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'मला असहाय्य वाटतंय' Amitabh Bachchan worried after returning on kbc 16 feeling helpless set wrote in blog due to this reason Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Divorce marathi news Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना चिंता सतावतेय! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'मला असहाय्य वाटतंय'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/04/84584c4e1d674c75d9afd0fe6a05a00b1722785807492322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडमधील कायम प्रसिद्धीझोतात असलेलं कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन कुटुंब गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात दुरावा आल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. असं असताना अभिषेकचे वडील म्हणजेच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. आता पुन्हा बिग बी त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये 'मला असहाय्य वाटतंय', असं म्हटलं आहे. यावरुन पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'डीप इमोशन'बद्दलच्या पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
अमिताभ बच्चन यांना चिंता सतावतेय!
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यापासून समोर येत आहे. या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी या दोघांमधील दुरावा वारंवार मीडियाने दाखवून दिला आहे. अंबानीच्या कार्यक्रमात दोघांनी एकत्र फोटो काढला नव्हता, यावरुन या चर्चांना पुन्हा उधाण आलं. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात काहीही नीट नसल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार आहेत. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्या दरम्यान अमिताभ यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगमुळे चर्चेत आले आहेत.
बिग बींची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन यांनी नवीन ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, त्यांना असहाय्य वाटत आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरून परतल्याचे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांच्या काही हृदयस्पर्शी कथा त्यांनी पाहिल्या. त्यावर त्यांनी लिहिलं की, सर्व अडचणी आणि संघर्ष असूनही स्पर्धक नेहमी हसतमुखाने हॉटसीटवर बसतात.
अमिताभ बच्चन म्हणाले, 'मला असहाय्य वाटतंय'
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं आहे, "गेममध्ये काही नवीन आणि मनोरंजक बदल झाले आहेत. याचा काय परिणाम होईल आणि काय शिकवण मिळेल? पण सगळ्यात जास्त म्हणजे जेव्हा स्पर्धकांचे निकाल आम्हांला त्यांची कहाणी सांगतात. ते ज्या कठीण परिस्थितीत राहतात आणि त्यांनी वर्षानुवर्षे सहन केलेला त्रास आणि अचानक ते हॉट सीटवर पोहोचतात आणि त्या क्षणी ते फार आनंदी असतात."
'या' कारणामुळे अमिताभ बच्चन यांना असहाय्य वाटतंय
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं की, "हे खूप हृदयस्पर्शी आहे आणि या स्त्री-पुरुषांच्या जीवनाची स्थिती पाहून मला खूप असहाय्य वाटतं. ते लाखो लोकांसमोर येतात, त्यांची धडपड आपण पाहतो… पण त्यांचे गोड हास्य आपल्याला सर्व काही विसरायला भाग पाडते. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धकांशी आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी समोर येत आहेत, ज्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी आहेत."
"लोकांचं जीवन सोपं करण्याचा प्रयत्न करा"
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं की, "आम्ही त्यांच्या वागण्या-बोलण्याने थक्क होतो आणि त्यांच्या गरजांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आणि त्यांच्या कठीण जीवनावर मात करण्याचा प्रयत्न करतो."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय भारतात परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट व्हायरल, 'डीप इमोशन'बद्दल म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)