Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन अनवाणी भर पावसात सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Temple) जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.
Amitabh Bachchan Visited Siddhivinayak Temple : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Temple) गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पावसात चप्पल न घालता बिग बी बाप्पाच्या दर्शनाला...
अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते अनवाणी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाताना दिसत आहेत. गुरुवारी पावसात मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात अमिताभ बच्चन बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बिग बींसोबत आणखी काही मंडळी आणि सुरक्षेसाठी पोलीसही सोबत दिसत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी कुर्ता पायजमा परिधान केलं होतं. तर शालदेखील घेतली होती.
View this post on Instagram
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा 'घुमर' (Ghoomer) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. याआधी अभिषेकचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. आता लेकाचा सिनेमा चालावा यासाठी अमिताभ बच्चन यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे, असे चाहते म्हणत आहेत. अमिताभ बच्चन हे धार्मिक आहेत आणि त्यांची बाप्पावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी सिद्धीविनायकाच्या मंदिरात जात बाप्पाचं दर्शन घेतलं.
अमिताभ बच्चन अनेकदा कुटुंबियांसोबत किंवा एकटेही सिद्धिविनायकाच्या मंदिरात बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. यंदाही अमिताभ बच्चन यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेत पूजादेखील केली. त्यावेळीही त्यांच्यासोबत पोलीस होते. अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीदेखील झलक पाहायला मिळणार आहे.
अभिषेक बच्चनच्या 'घुमर'बद्दल जाणून घ्या...
अभिषेक बच्चनचा बहुचर्चित 'घुमर' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महिला क्रिकेटर अनिनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर (Saiyami Kher) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिषेक क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आर. बाल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक आणि सैयामीसह शिवेंद्र सिंह आणि इनवाका दासही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकला खास पोस्ट शेअर करत 'घुमर'साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या