Ghoomer Trailer: 'लाइफ लॉजिक नहीं मॅजिक का खेल है'; अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या घुमरचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
घुमर (Ghoomer) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
Ghoomer Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा घुमर (Ghoomer) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये एका खेळाडूची भावना, जिद्द आणि कष्ट हे दिसत आहे.
घूमर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते की, एका अपघातात सैयामी तिचा एक हात गमावते. सैयामी ही क्रिकेटपटू असते. अपघातानंतर एका हातानं क्रिकेट कसं खेळायचं? असा प्रश्न सैयामीला पडलेला असतो. तितक्यात तिच्या आयुष्यात एका कोचची एन्ट्री होते.
घुमर या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते, जेव्हा तो एका खेळाडूला ट्रेन करताना करतो. त्या खेळाडूची भूमिका सैयामी खेरनं साकारली आहे.
आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. "घूमर" चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांची झलक देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.शिवेंद्र सिंह आणि इनवाका दास हे कलाकार देखील या चित्रपटात काम करणार आहेत.
कधी रिलीज होणार "घूमर"?
आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित "घूमर" हा चित्रपट 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.अभिषेक बच्चननं सोशल मीडियावर "घूमर" चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, 'बाएँ हाथ का खेल।'
View this post on Instagram
अभिषेक बच्चनच्या लुडो, बॉब बिस्वास, मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या घूमर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या: