Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. पण त्यांच्या पाच चित्रपटांनी प्रेक्षकांना चांगलच हलवलं. तिकीट खिडकीवरही मोठा परिणाम झाला. या पाच चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं.
Amitabh Bachchan : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 80 आणि 90च्या दशकात चित्रपट हिट होण्यासाठी त्यांचे एकटे नाव पुरेसे होते. मोहब्बतें चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे थोडेसे हटके होते किंवा त्यांच्या व्यक्तिरेखेचा रंग वेगळा होता. नवीन भूमिकांमध्येही अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रतिभेची छाप सोडली. वर्षानुवर्षे, त्याने त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले. त्यांना त्याची ॲक्शन, रोमान्स आणि अँग्री यंग मॅन इमेज आवडली. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. पण त्यांच्या पाच चित्रपटांनी प्रेक्षकांना चांगलच हलवलं. तिकीट खिडकीवरही मोठा परिणाम झाला. या पाच चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं.
1.) बदला (Badla)
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या बदला या चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा एकदा अमिताभ बच्चनसोबत दिसली होती. त्याचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट द इनव्हिजिबल गेस्ट या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक होता. रुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटाची केवळ 10 कोटींमध्ये निर्मिती करण्यात आली होती. परंतू बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 138.49 कोटींची कमाई केली होती.
2.) वजीर (Wazir)
अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट बेजॉय नांबियार यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट देखील एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता, ज्यामध्ये अमिताभ सोबत फरहान अख्तर, मानव कौल, अदिती राव हैदरी आणि नील नितीन मुकेश देखील दिसले होते. 35 कोटी रुपयांत हा सिनेमा बनला होता. 1977 मध्ये या चित्रपटाने 78.7 कोटींची कमाई केली होती.
3.) पिंक (Pink)
मुलींना न्याय देणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वकिलाच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. तापसी पन्नू व्यतिरिक्त या चित्रपटात कीर्ती कुल्हारी आणि आंद्रिया तारियांग देखील होते. 30 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 157.32 कोटी रुपये कमवले.
4.) पीकू (Piku)
या कॉमेडी ड्रामा चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्या इनिंगमध्येही कॉमेडीमध्ये आपली स्पर्धा नाही हे दाखवून दिले. या चित्रपटात त्यांच्यासोबत दीपिका पदुकोण आणि इरफान खानसारखे अनुभवी कलाकार होते. 42 कोटी रुपयांत निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 141 कोटींची कमाई केली होती.
5.) सत्याग्रह (Satyagraha)
हा एक राजकीय ड्रामा चित्रपट होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी मनोज बाजपेयी, अमृता राव, अर्जुन रामपाल, करीना कपूर यांसारख्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली होती. प्रकाश झा यांचा हा चित्रपट 73 कोटी रुपयांत बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 97.1 कोटींचा गल्ला जमवला.
संबंधित बातम्या