एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिग बी स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेचे सदिच्छादूत होणार?
मुंबई : स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बिग बींना सदिच्छादूत होण्याबाबत विनंती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसंच मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. हा उपक्रम प्रभावशाली होण्यासाठी या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विनंती करण्यात येणार आहे. बिग बी हे राज्य शासनाच्या वन विभाग तसंच क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेचेही ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
सांगलीतील म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्त्रीभ्रूण हत्या विरोधी राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार भारती लव्हेकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
राज्यात मुलींचा जन्मदर काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. राज्यात सर्वाधिक जन्मदर हा भंडारा जिल्ह्यात आहे. 2015 च्या तुलनेत राज्यात 78 अंकांनी मुलींचा जन्मदर वाढला आहे. सर्वात कमी जन्मदर वाशिम जिल्ह्याचा असून ही मात्र चिंताजनक बाब असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कठोर पावलं यापूर्वीच उचलली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत अन्य राज्यांचे जिल्हे आहेत. त्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जाते आणि महाराष्ट्रात येऊन गर्भपात केला जातो. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने कर्नाटक, गुजरात यासारख्या राज्यांना पत्र लिहून आवश्यक ती उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
गर्भलिंग चाचणीसाठी गर्भवतीला प्रवृत्त करणाऱ्या आणि तिच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तीला पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 23(3) नुसार शिक्षेची तरतुद आहे. या कलमाची यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तिंना कठोर शिक्षा करावी असं डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement