Alpha Release Date : 'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट समोर, आलिया भट आणि शर्वरीही स्पाय एजंटच्या भूमिकेत
Alpha Release Date Announced : आलिया भट्टच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट थिएटमध्ये कधी दाखल होणार, ते जाणून घ्या.
Alia Bhatt, Sharvari Alpha Movie Latest Update : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट यशराज फिल्मच्या आगामी स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या अल्फा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'अल्फा' चित्रपट स्पाय युनिव्हर्सवर आधारित असून यामध्ये आलिया आणि शर्वरी स्पेशल एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट समोर
अल्फा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. आलियाला स्पायच्या भूमिकेत नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. याशिवाय, मुंज्या आणि वेदा चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेली अभिनेत्री शर्वरीदेखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी सौंदर्य आणि ॲक्शन पॅक मनोरंजनाची डबल मेजवाणी मिळणार आहे.
आलिया भट आणि शर्वरीही स्पाय एजंटच्या भूमिकेत
'अल्फा' चित्रपटासोबतच यशराज फिल्म (YRF) स्पाय युनिव्हर्समध्ये बॉलिवूड ब्लॉकबस्टर 'एक था टायगर', 'टायगर 3', 'पठाण', 'वॉर' आणि आगामी 'वॉर 2' या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते, मात्र या चित्रपटातील स्टार्सचा लूक अद्याप समोर आलेला नाही. याची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
या दिवशी रिलीज होणार 'अल्फा' चित्रपट
बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या 'अल्फा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अखेर आज जाहीर केली आहे. यशराज फिल्मने सोशल मीडियावर पोस्ट करत रिलीज डेटची घोषणा केली आहे. YRF ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'अल्फा' चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
आलिया आणि शर्वरी महत्त्वाच्या भूमिकेत
YRF ने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "ख्रिसमस 2025 रोजी, अल्फा उदयास येईल! ॲक्शन-पॅक्ड हॉलिडेसाठी तयार व्हा. 25 डिसेंबर 2025." अल्फा चित्रपटात आलिया आणि शर्वरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव रावेल यांनी केलं आहे, तर चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. हा चित्रपट हिंदीसह, तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
ॲक्शन पॅक मनोरंजनाचा धमाका
आलिया आणि शर्वरी या दोघीही या चित्रपटात सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनसाठी दोन्ही अभिनेत्रींनी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय तेलुगू आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या ॲक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. त्याने यापूर्वी धूम 3, शाहरुख खान स्टारर फॅन आणि आर माधवनचा द रेल्वे मॅन या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'अल्फा'ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :