Alia-Ranbir Welcome Baby Girl: माधुरी दीक्षित,अक्षय कुमार अन् अनुष्का शर्मा; आलिया रणबीरला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरला (Ranbir Kapoor) कन्यारत्न झालं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या.
Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलियाचे चाहते आणि रणबीरचे चाहते सध्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. तसेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री अनुष्का शर्मानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये अनुष्कानं आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही पालक झाला आहात, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि बेबी गर्लला प्रेम आणि आशीर्वाद देते.'
रणबीरची बहिण रिध्दिमा कपूरनं देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिद्धिमानं आलिया आणि रणबीरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला रिद्धिमानं कॅप्शन दिलं, 'आज सर्वात आनंदी दिवस आहे. चिमुकल्या मुलीला आत्याकडून खूप प्रेम'
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या पोस्टला अक्षयनं कमेंट केली, 'आलिया आणि रणबीर तुम्हाला शुभेच्छा. मुलगी होणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. '
माधुरी दीक्षित, मौनी रॉय आणि नेहा धुपिया या सेलिब्रिटींनी देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
आलियाची पोस्ट
आई झाल्यानंतर आलियानं एक पोस्ट शेअर केली. 'आमच्या आयुष्यातील ही सर्वात बेस्ट बातमी. आमचं बाळ या जगात आलं आहे. ती मॅजिकल गर्ल आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.' ही पोस्ट शेअर करुन आलियानं कॅप्शनमध्ये ब्लॅक हार्ट इमोजीचा वापर केला आहे. आलियानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एका सिंहाच्या कुटुंबाचा फोटो दिसत आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Alia Ranbir Baby: आई झाल्यानंतर आलियानं सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...