Alia Ranbir Baby: आई होताच आलियानं सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...
नुकतीच आलियानं (Alia Bhatt) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून आलियानं आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक नेटकरी सध्या आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच आलियानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून आलियानं आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
आलियाची पोस्ट
'आमच्या आयुष्यातील ही सर्वात बेस्ट बातमी. आमचं बाळ या जगात आलं आहे. ती मॅजिकल गर्ल आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.' ही पोस्ट शेअर करुन आलियानं कॅप्शनमध्ये ब्लॅक हार्ट इमोजीचा वापर केला आहे. आलियानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एका सिंहाच्या कुटुंबाचा फोटो दिसत आहे.
आलियानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'कपूर कुटुंबाला शुभेच्छा'. नेहा धुपिया, कपिल शर्मा, सोनम कपूर, क्रिती सेनन, रिया कपूर, जोया अख्तर आणि ईशान खट्टर या सेलिब्रिटींनी आलियाच्या या पोस्टला कमेंट करुन आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
आलिया रणबीरची लव्हस्टोरी
आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Alia-Ranbir Welcome Baby Girl: आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव