एक्स्प्लोर

Brahmastra Box Office : आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'ची रेकॉर्डब्रेक कमाई; सुपरहिट 'ब्रह्मास्त्र' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने जगभरात 225 कोटींची कमाई केली आहे.

Brahmastra Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी या सिनेमाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

पहिल्याच वीकेंडला 'ब्रह्मास्त्र'चा धमाका

'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. जगभरात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने जगभरात 225 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'ब्रह्मास्त्र'ने रचला इतिहास

गेल्या काही दिवसांपासून अनेक बिग बजेट बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत आहे. अशातच 'ब्रह्मास्त्र'ने रेकॉर्डब्रेक कमाई करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला या सिनेमाने जगभरात 225 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

'ब्रह्मास्त्र'ची कमाई जाणून घ्या...

'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 75 कोटी, शनिवारी 85 कोटी आणि रविवारी 65 कोटींची कमाई केली आहे. हिंदीत या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी, दुसऱ्या दिवशी 37 कोटी तर तिसऱ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे हिंदीत या सिनेमाने 125 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 225 कोटींची कमाई केली आहे. 

'ब्रह्मास्त्र'तील गाणी सोशल मीडियावर व्हायरल

'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची झलकदेखील सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया', 'देवा देवा' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावरदेखील ही गाणी व्हायरल होत आहेत.  अयान मुखर्जीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  

संबंधित बातम्या

Brahmastra OTT Release : घरबसल्या पाहता येणार 'ब्रह्मास्त्र'; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मस्त्र'नं केला 100 कोटींचा टप्पा पार; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
Embed widget