(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra OTT Release : घरबसल्या पाहता येणार 'ब्रह्मास्त्र'; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल.
Brahmastra OTT Release : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. देशातच नाही तर जगभरातील लोकांची या चित्रपटानं पसंती मिळवली आहे. जगभारातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 160 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हा चित्रपटओटीटीवर कधी रिलीज होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ब्रह्मास्त्र कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मास्त्रचे ओटीटी राइट्स हे डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मला विकले आहेत. अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार हे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे डिस्ट्रिब्यूशन पार्टनर आहेत. त्यामुळेच या प्लॅटफॉर्मनं चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटानं तीन दिवसांमध्ये 125 कोटींची कमाई केली. रिलीजच्या सहा आठवड्यांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. धर्मा फिल्म्सचं अॅमेझॉनसोबतदेखील बोलणं सुरू आहे.
अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. तिसऱ्या दिवशी 46 कोटींचे कलेक्शन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलं. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 125 कोटींची कमाई केली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :