आलिया की दीपिका? स्त्री 2 चा दिग्दर्शक अमर कौशिकनं शेवटी एकीला निवडलंच, म्हणाला, 'दोघींसोबत काम करायचंय पण..'
एका रॅपीडफायर मध्ये अमर कौशिकला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनं दोघींसोबत काम करायचंय म्हणत एकीची निवड केलीच.

Alia Bhatt or Dipika: दीपिका पदुकोण आणि आलिया भट या दोन्ही अभिनेत्रींची बॉलीवूड मधल्या आघाडीच्या आणि यशस्वी कलाकारांच्या यादीत गणना होते .या दोघींचे अनेकदा तुलनाही केली जाते .कोण चांगली अभिनेत्री आहे असा प्रश्न आतापर्यंत अनेकदा विचारण्यात आलाय पण दोघींपैकी एकाची निवड करणं भल्याभल्यांना कठीण जातं .बॉलीवूडचा गाजलेल्या स्त्री 2 चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) याच्यासमोरही नुकताच एका रॅपिड फायरमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता .त्यावेळी कोणासोबत काम करायला आवडेल ..दीपिका पदुकोण की आलिया भट ? याच्यावर क्षणभर थांबत त्यानं मला दोघींसोबत काम करायचा आहे असं म्हणत शेवटी एकीची निवड केलीच . (Bollywood)
कोणाची निवड केली?
गेम चेंजर्स वरील कोमल नहाटा सोबतच्या एका रॅपिड फायर सेगमेंटमध्ये कॉमेडी हॉरर चित्रपट शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमर कौशिकला आलिया भट आणि दीपिका पदुकोण या दोघींपैकी चांगली अभिनेत्री निवडण्यास सांगितले गेलं .सुरुवातीला तो म्हणाला मला दोघींसोबत काम करायचा आहे .पण अखेर त्याने आलिया भट ची निवड सगळ्यात चांगली अभिनेत्री म्हणून केली .इम्तियाज अली यांनीही त्याच व्यासपीठावर दिलेल्या प्रतिसादाचे प्रतिबिंब कौशिकच्या निवडीवर उमटल्याचं दिसलं . इम्तियाज ने दीपिका सोबत तमाशा आणि लव आजकल या चित्रपटांमध्ये काम केलंय .तर आलिया सोबत हायवे चित्रपटात काम केलं .पण जेव्हा इम्तियाज अलीला हाच प्रश्न विचारला तेव्हाही ते आलियाच्या दिशेनेच झुकल्याच दिसलं .पण यातली सगळ्यात विशेष बाब म्हणजे अमर कौशिक ने अजून या दोन्ही अभिनेत्री सोबत काम केलेलं नाही .
दीपिकासोबत हलकी फुलकी मजेदार भूमिका ....
2024 मध्ये पिंकविलाच्या एका प्रश्नावर उत्तर देतानाही कौशिकने दीपिका पदुकोणला हलक्याफुलक्या एखाद्या भूमिकेत घेण्यासाठी रस दाखवला होता .तेव्हा तो म्हणाला होता मला दीपिका सोबत चेन्नई एक्सप्रेस शैलीसारख्या एखाद्या विनोदी चित्रपटात काम करायला आवडेल .
अमर कौशिक चा अलीकडचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे स्त्री 2.2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अपारशक्ती खुराणा आणि अभिषेक बॅनर्जी पंकज त्रिपाठी अशी धमाकेदार टीम होती .त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पण हिट झाला . तू आता मॅड ऑफ हॉरर कॉमेडी युनिव्हर्स मधील पुढचा चित्रपट 'थामा 'ची निर्मिती करतोय .हा चित्रपट 2025 चे दिवाळीत प्रदर्शित होणार आहे .त्याच्या या सिनेमात आयुष्यमान खुराणा आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत तर परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हेही तगडे अभिनेते आहेत .
हेही वाचा:
























