एक्स्प्लोर

Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर 'मम्मा' आलियानं शेअर केला पहिला फोटो; तुम्ही पाहीलात का?

Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Alia Bhatt Latest Pic : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. आलियाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आलियाने लेकीच्या जन्मानंतर पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलियाचा चेहरा ब्लर दिसत असून तिच्या हातातील कॉफी मग मात्र स्पष्ट दिसत आहे. कॉफी मगवर 'mama' असं लिहिलेलं आहे. हा फोटो शेअर करत आलियाने 'ही मी' असं कॅप्शन लिहिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया घेणार ब्रेक!

बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट आता एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 

आलियाचे आगामी सिनेमे - 

काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता आलिया आणि रणवीर सिंहचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

आलिया रणबीरची लव्हस्टोरी 

आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. आलियानं काही महिन्यांपूर्वी रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत होते. हा फोटो शेअर करन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं होतं.

संबंधित बातम्या

Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget