Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे.
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. 6 नोव्हेंबरला आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची नावे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी रणबीर आणि आलियाच्या आलिशान घराच्या वास्तूचे कधीही न पाहिलेले फोटो घेऊन आलो आहोत. आलियाच्या घराच्या या आतल्या फोटोंमध्ये तुम्हाला बरेच वेगळेपण पाहायला मिळेल.
रणबीर आणि आलियाचे आलिशान घर
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. याचा अंदाज तुम्ही या फोटोंवरून सहज लावू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रणबीर आणि आलियाच्या घराचे हे आतील फोटो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
आलिया-रणबीरच्या घरात हिंदी चित्रपटसृष्टीतील शो मॅन आणि रणबीर कपूरचे आजोबा राज कपूर यांचा फोटो भिंतीवर दिसतोय. याशिवाय रणबीर-आलियाच्या घराच्या भिंतीवर तुम्हाला फुटबॉल क्लब बार्सिलोनाची 8 क्रमांकाची जर्सीही दिसेल. याशिवाय, या वास्तूमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू सिंह आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा फॅमिली फोटो दिसेल. यासोबतच दोन्ही कलाकारांचे सर्व चित्रपट पुरस्कार, ट्रॉफी या शोकेसची शोभा अधिक वाढवत आहेत. लिव्हिंग रूमपासून ते ड्रॉईंग रूमपर्यंत आलिया आणि रणबीरच्या घराचा प्रत्येक कोपरा अगदी सुंदर दिसतोय.
Alia Bhatt and Ranbir Kapoor’s home at Vastu - a thread! pic.twitter.com/o2Y8h9uSgd
— ira💌 (@aliaisperfx) November 11, 2022
सोशल मीडियावर फोटोंचा बोलबाला
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या आलिशान बंगल्यातील वास्तूचे हे आतले फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहेत. आलिया आणि रणबीरचे चाहते त्यांच्या घराच्या या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. त्यामुळे हे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :