(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Setu : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी अक्षय कुमारवर साधला निशाणा; चुकीचे तथ्य मांडल्याचा केला आरोप
Subramanian Swamy On Ram Setu : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'राम सेतु' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
Akshay Kumar Ram Setu Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी खिलाडी कुमार आणि राम सेतु सिनेमावर निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी अक्की यांनी राम सेतू या सिनेमात चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि राम सेतुच्या टीमवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे,"मी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. अक्षयच्या आगामी 'राम सेतू' या सिनेमात सेतूबाबत चुकीचे तथ्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे राम सेतूची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे".
'राम सेतु' कधी होणार रिलीज?
अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'राम सेतु' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या दिवळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राम सेतु' या सिनेमात जॅकलीन फर्नांडीज आणि नुसरत भरुचादेखील आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक शर्माने सांभाळली आहे. हा सिनेमा 24 ऑक्टोबरला दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
The suit for compensation has been finalised by my associate Satya Sabharwal Adv. I am suing Akshay Kumar, actor & Karma Media for damages cause by falsification in portrayal of the Ram Setu issue in their film for release.
— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022
अक्षयकडे सिनेमांची रांग!
राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रक्षाबंधन', आणि 'मिशन सिंड्रेला' हे अक्षयचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. कोरोनामुळे या सिनेमांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत.
संबंधित बातम्या