Selfiee : सुपरफ्लॉप 'सेल्फी'साठी अक्षयनं घेतलं कोट्यवधींचे मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांच्या फीबाबत...
सेल्फी या चित्रपटासाठी अक्षयनं कोट्यवधींचं मानधन घेतलं. जाणून घेऊयात सेल्फीसाठी अक्षय आणि इतर कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत....
Akshay Kumar Fee for Selfie : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या त्याच्या सेल्फी (Selfie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या या बिग बजेट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचा देखील टप्पा गाठलेला नाही. सेल्फी या चित्रपटासाठी अक्षय कुमार याने कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं. जाणून घेऊयात सेल्फीसाठी अक्षय आणि इतर कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत....
कलाकारांचे मानधन
डायना पॅन्टी,अक्षय कुमार, इमरान हाश्मी, नुसरत भरूचा यांनी सेल्फी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सेल्फी या चित्रपटाची निर्मिती 80 कोटींमध्ये केली गेली आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटासाठी 35 कोटींचे मानधन घेतले. तर इमरान हाश्मीनं या चित्रपटासाठी 7 कोटी मानधन घेतलं. नुसरत भरूचानं या चित्रपटासाठी 4 कोटींची फी घेतली. तर डायना पॅन्टीनं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 75 लाख रुपये घेतले आहेत.
अक्षय हा एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जवळपास 50 ते 100 कोटी मानधन घेतो. पण त्यानं सेल्फीसाठी 35 कोटींचे मानधन घेतले. अक्षयचे काही चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. त्यामुळे अक्षयनं आपलं मानधन कमी केलं का? असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडत आहे.
अक्षयचे 'हे' चित्रपट ठरले फ्लॉप
2022 मध्ये रिलीज झालेले अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. त्याच्या 'बच्चन बांडे', 'रक्षाबंधन','सम्राट पृथ्वीराज',' रामसेतू' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता त्याचा सेल्फी हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला आहे.
फ्लॉप चित्रपटांबद्दल काय म्हणाला अक्षय?
एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितलं, "हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय असं नाही. माझ्या करिअरमधील जवळपास 16 चित्रपट फ्लॉप ठरले. असा काळ देखील होता, जेव्हा माझे आठ चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ नका. 100 टक्के ही माझी चूक आहे. तुमचा चित्रपट फ्लॉप ठरतो तर तो प्रेक्षकांमुळे नाही. तुम्ही चुकीचा चित्रपट निवडल्याने तो फ्लॉप ठरतो."
अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर त्याचा वेडात मराठे वीर दौडले सात हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Selfiee Review : सेलिब्रिटींसोबत 'सेल्फी' काढण्याचा अट्टाहास; चाहत्याची गोष्ट मांडणारा चित्रपट