एक्स्प्लोर
Advertisement
सुकमा हल्ला, शहीद जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची एक कोटींची मदत
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं जवानांविषयी असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. यावेळीही तो जवानांसाठी धावून आला आहे. छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अक्षय कुमारने या जवानांची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
सीआरपीएफनेही एका पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. अक्षय कुमार सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रुपयांची मदत करणार आहे, अशी माहिती सीआरपीएफने दिली.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 12 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भेज्जी परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते.
रस्ते निर्माण सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना निशाणा साधत नक्षलवाद्यांनी सुरुवातीला आयईडी ब्लास्ट केला, त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इतकंच नाही तर नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारं, रेडिओ सेट आणि इतर सामान लूटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement