3 सिक्वेल, 2 ओरिजिनल आणि एक हॉरर चित्रपट, 2025मध्ये बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार करणार राज्य!
2025 Upcoming Films: 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचाच बोलबाला असणार आहे. कारण, येत्या वर्षात एकापेक्षा एक असे अनेक हिट चित्रपट अक्षय कुमार आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे.
Akshay Kumar 2025 Upcoming Films: 2024 हे वर्ष अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) नव्हतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यंदाच्या वर्षात अक्षय कुमारच्या चित्रपटांची जादू बॉक्स ऑफिसवर (Box Office) फारशी चालली नाही. अक्षयच्या तीन चित्रपटांनी एका आठवड्याच्या आतच गटांगळ्या खाल्या. त्यातल्या त्यात एक उत्तम बाब म्हणजे, त्याचा कॅमिओ असलेल्या चित्रपटाला ब्लॉक बस्टरचा टॅग मिळाला. यामध्ये स्त्री 2 च्या नावाचाही समावेश आहे. मात्र, बडे मियाँ छोटे मियाँ, खेल खेल में आणि सरफिरा या चित्रपटांची नावं फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील आहेत. असं असलं तरीदेखील येतं वर्ष मात्र, खिलाडी कुमारसाठी धमाकेदार ठरणार आहे. येत्या 2025 मध्ये अक्षय कुमारचे एकापेक्षा एक धमाकेदार मूव्ही बॉक्स ऑफिस गाजवायला येणार आहेत. या यादीत 3 सिक्वेल, 2 ओरिजिनल आणि एका हॉरर चित्रपटाचा समावेश आहे.
2025 मध्ये अक्षय कुमारचे कोणते चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी तयार?
स्काय फोर्स (Sky Force)
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांपैकी पहिला चित्रपट स्काय फोर्स आहे. ज्याची अनाउंसमेंट 2023 मध्ये झाली होती. तसेच, 24 जानेवारी 2025 मध्ये चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहे. दरम्यान, सर्वात आधी हा 2 ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीज करण्यात आला होता.
वेलकम टू द जंगल (Welcome To The Jungle)
अक्षय कुमार 2025 मध्ये आपला मल्टीस्टारर चित्रपटासह थिएटर गाजवण्यासाठी सज्ज आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटात दिशा पाटनी, जॅकलीन फर्नांडीज, रवीना टंडन, संजय दत्त, परेश रावल, लारा दत्ता, सुनील शेट्टी, अनिल कपूर, तुषार कपूर, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, बॉबी देओल, राजपाल यादव आणि इतरही अनेक स्टार्स दिसणार आहेत.
शंकरा (Shankara)
अक्षयच्या आगामी चित्रपटांमध्ये शंकरा या चित्रपटाचाही समावेश आहे. IMBD नुसार, ही एक पीरियड फिल्म आहे, ज्यामध्ये आर. माधवन आणि अनन्या पांडे लीड रोलमध्ये आहेत. तसेच, 14 मार्च 2025 रोजी थिएटर्समध्ये दिसणार आहे.
हाऊसफुल्ल 5 (Housefull 5)
चौथा चित्रपच आहे हाऊसफुल 5, याची घोषणा साजिद नाडियाडवालानं हल्लीचे केली आहे. हाऊसफुल भारतातील सर्वात मोठी कॉमेडी सीरीज आहे, जी 6 जून 2025 मध्ये रिलीज झाली होती.
भूत बंगला (Bhoot Bangla)
अक्षय कुमार दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत हॉरर कॉमेडी घेऊन येत आहे. याची घोषणा अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आली होती.
जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3)
जॉली एलएलबीचा प्रीक्वल, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि अरशद वारसी दिसणार आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये चित्रपटगृहांमध्ये दिसणार आहे.
दरम्यान, अक्षयच्या या चित्रपटांव्यतिरिक्त भागम भाग 2 ची देखील चर्चा आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल हे धम्माल त्रिकुट पोट धरुन खळखळवून हसवण्यासाठी सज्ज आहे.