Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरेंची आज महाराष्ट्राला गरज होती : अजिंक्य देव
Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), माहेरची साडी (Maherchi Sadi) ते आई-वडिलांचं हरवलेलं छत्र अशा अनेक विषयांवर अभिनेता अजिंक्य देवने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
Ajinkya Deo : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी आणि हॉलिवूड गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) या सिनेमाचा विषय निघाला की स्टारकिड अजिंक्यचं नाव निघतंच. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना उजाळा देत एक खंत व्यक्त केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत अजिंक्य देव (Ajinkya Deo On Balasaheb Thackeray) म्हणाले,"बाळासाहेब ठाकरेंना अनेकदा मी भेटलो आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मी अनेकवेळा मातोश्रीवर गेलो आहे. ठाकरे आणि देव कुटुंबाचं एक नातं आहे. बाळासाहेबांचं कमाल वलय होतं. लहानपणी बाळासाहेबांचं वलय माहिती नव्हतं. त्यावेळी मी त्यांच्या मांडीवर बसलेलो आहे. पुढे मोठं झाल्यावर त्यांच्याबद्दल कळू लागलं".
अंजिक्य देव पुढे म्हणाले,"बाळासाहेब ठाकरे हे अद्भूत व्यक्ती आहेत. माझ्या एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते सेटवर आले होते. त्यावेळी बापाचं नाव मोठं करशील असा आशीर्वाद त्यांनी मला दिला होता. त्यांचं बोलणं स्फुर्तीदायक होतं. एखादी गोष्ट प्लॅन न करता ते मनापासून बोलत असे. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची खरी गरज होती. पण मला त्यांचा आशीर्वाद मिळाला यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली आहे".
'माहेरची साडी' हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. या सिनेमाबद्दल बोलताना अंजिक्य देव (Ajinkya Deo On Maherchi Sadi) म्हणाले,"माहेरची साडी' या सिनेमासाठी मला विजय कोंडकेंनी विचारणा केली होती. पावणे दोन तास ते मला गोष्ट ऐकवत होते. या सिनेमात कुठे टाळ्या मिळतील, महिला कुठे रडतील या सर्व गोष्टी विजय यांना त्यावेळीच माहिती होत्या".
'माहेरची साडी' सुपरहिट होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं : अजिंक्य देव
अजिंक्य देव पुढे म्हणाले,"माहेरची साडी' या सिनेमाच्या ट्रायलवेळी मी म्हणालो होतो की, माझ्या नावावर आणखी एक फ्लॉप पडणार. पण त्याच दिवशी मला जाणवलं की आपल्याला खरचं महाराष्ट्राचं ज्ञान नाही. 'माहेरची साडी' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. गावांमध्ये ट्रकभरून बायका हा सिनेमा पाहायला येत असे. पण तरीही हा सिनेमा एवढा सुपरहिट होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं".
आई-बाबांमुळे मी इंडस्ट्रीत आलो आहे. मी इंडस्ट्रीत यावो अशी आईची फार इच्छा नव्हती. माझ्या इंडस्ट्रीतील पदार्पणावरुन आई-बाबांचे वाद झाले असणार. पण कुठेतरी मला मनोरंजनसृष्टीची गोडी निर्माण झाली होती. पण 'सर्जा'च्या शूटिंगआधापासूनच बाबांनी (रमेश देव) मला अभिनयक्षेत्राची ओळख करुन दिली होती. मी या क्षेत्रात नाव कमवावं अशी त्यांची फार इच्छा होती".
संबंधित बातम्या